इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महिलांचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून नेहमी राजकीय भूमिका घेण्याची ख्याती मिळवलेल्या राज्य महिला आयोगाने अजून एक नवीन प्रताप केला आहे. कोथरूडमधील ज्या मुलींवर पोलिसांनी अश्लील व जातीवाचक शेरेबाजी केली त्यांच्या घरात चुकीच्या पद्धतीने घुसून बेकायदेशीर झाडाझडती घेतली. त्या मुलींची ओळख व नाव हे आजवर सर्वांनीच गोपनीय ठेवलं होतं मात्र झोपेतून जागे झालेल्या महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये सदर मुलीचे नाव टाकले आहे. BNS S72 नुसार हा गंभीर गुन्हा केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आधीच खोटी कट कारस्थाने करून अडचणीत असलेल्या मागासवर्गीय मुलींचे चारित्र्य हनन करून त्यांना पूर्णपणे नाऊमेद करण्याचं काम राज्य महिला आयोगानं केलं आहे आणि हेच ट्विट re-post करून महिला आयोगाच्या अध्यक्षांनी देखील शोषित मुलींच्या जखमेवर मीठ चोळल. अशा या बेजबाबदार व संवेदनाहीन वागणुकीबाबत सरकारने तत्काळ महिला आयोगावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.