इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यात बॅ. ए. आर. अंतुले साहेब यांच्यापासून तर आर. आर. पाटील (आबा) यांच्यापर्यंत अनेक नेत्यांभोवती वेगवेगळ्या वादाचं मोहोळ निर्माण निर्माण झालं होतं. त्यामध्ये आता सरकारमध्ये असलेल्या खुद्द अजितदादांचाही समावेश असून या सर्वांनीच त्या-त्या वेळी मंत्रिपदाचा त्याग केला. शिवाय ज्या ज्या वेळी भाजप विरोधात होती त्या प्रत्येक वेळी त्यांनीही राजीनाम्यासाठी आकांडतांडव केलंच होतं.. मग आज संदिपान भुमरे, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक हेच अपवाद का? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी वादग्रस्त नेत्यांचे राजीनामे घेण्याची मागणी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, कायमच नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपकडून या नेत्यांना का पाठीशी घातलं जातंय? की या सर्वांना तुमच्या वॉशिंग मशिनमध्ये दुधाने आंघोळ करुन पवित्र संत-महात्मा केलं? तुमच्या नैतिकतेची हीच खरी परिक्षा असून या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!
रोहित पवार यांनी या तीन नेत्यांचेच नाव घेतले आहे. गेल्या काही दिवसात अनेक मंत्री वादात पडले असून त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे.