शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं…रोहित पवार यांची पोस्ट चर्चेत

by India Darpan
एप्रिल 20, 2025 | 7:36 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
rohit pawar


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत असल्याची पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या पोस्टनंतर त्यावर प्रतिक्रिया येवू लागल्या आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ज्येष्ठ सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतलेली मुलाखत प्रसारीत झाली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबरच्या युतीबद्दल मोठे विधान केले. त्यात आमच्यातील वाद, आमच्यातील भांडण, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं हे वाद या गोष्टी शुल्लक आहेत असे राज ठाकरे यांनी सांगत उध्दव ठाकरेंना युतीचे संकेत दिले.

त्यानंतर आता उध्दव ठाकरे यांची सकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवालयला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे. त्यांनी अप्रत्यक्ष तयारी दाखवल्यानंतर एक अटही समोर ठेवली. माझ्याकडून कुणाशी भांडण नव्हतंच, पण, एकत्र येण्यासाठी महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे. चोरांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाही. त्यांचा प्रचार करायचा नाही. अगोदर ही शपथ घ्यावी असेही ते म्हणाले.

या ठाकरे बंधुच्या प्रतिक्रियेनंतर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तिथेही ठाकरे आहेत. इथेही ठाकरे आहेत. दोघे भाऊ आहेत. हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाले. त्यातून मार्ग वेगळे झाले असले तरी उध्दव ठाकरे यांचा मार्ग कायम महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. राज ठाकरे यांचे विधान मी पण एेकलं. उध्दव ठाकरे यांनाही एेकलं त्यांनी भूमिका मांडली. या भूमिकेचं स्वागत आहेत. आम्ही सकारत्मक भूमिकेतून याकडे बघतोय असे राऊत म्हणाले. आम्ही वेट अँण्ड वॅाचच्या भूमिकेत आहोत. राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही असेही राऊत म्हणाले.

या सर्व प्रतिक्रियावर आमदार रोहित पवार यांची बोलकी प्रतिक्रिया समोर आली. त्यामुळे ती चर्चेची ठरली.

मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या #महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर #सर्वच कुटुंबांनी #महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे.@OfficeofUT… pic.twitter.com/yhohAehobQ

— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 19, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरात घुसून महिलेचा विनयभंग…जेलरोड परिसरातील घटना

Next Post

हिंदी भाषेची सक्ती म्हणजे हिंदूमध्ये फूट पाडण्याचा प्रकार….मनसेचे थेट सरसंघचालकांना पत्र

Next Post
Untitled 23

हिंदी भाषेची सक्ती म्हणजे हिंदूमध्ये फूट पाडण्याचा प्रकार….मनसेचे थेट सरसंघचालकांना पत्र

ताज्या बातम्या

crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011