इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रक्तपेढ्यांची मान्यता देताना ज्या संस्थाना तांत्रिक समितीची शिफारस नव्हती अशा संस्थाना आरोग्यमंत्र्यांच्या एका फोनवरून बेकायदेशीर पद्धतीने मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे रक्तदानासारखे पवित्र कार्य बदनाम होत असून, या सामाजिक कार्यावर समाजाचा विश्वास कमी झाला तर आरोग्य क्षेत्राला याची खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते असे सांगत आमदार रोहित पवार यांनी टीका केली.
त्यांनी म्हटले की, महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था पोखरणारे आरोग्य मंत्री आज आहेत, उद्या जनता त्यांना घरी बसवणारच आहे, परंतु दोन महिन्यांनी जनतेचे मविआ सरकार आल्यावर मात्र गैरप्रकारांना चालना देणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही ही बाब सर्वांनी लक्षात असू द्यावी. उद्या होणाऱ्या राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या बैठकीत कायदे आणि नियम पाळूनच निर्णय होतील, ही अपेक्षा!