इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विद्रोही कवी पदश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारलेल्या चल हल्ला बोल चित्रपटाला सेन्सॅार बोर्डाने परवानगी नाकारली. चित्रपटातील सर्व कविता काढून तो प्रदर्शित करण्याची अट सेन्सॅार बोर्डाने निर्मात्यांसमोर ठेवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोण नामदेव ढसाळ, आम्ही ओळखत नाही असे नोटीसमध्ये म्हटल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी सांगितले.
त्यानंतर सेन्सॅार बोर्डाच्या या भूमिकेवर जोरदार टीका सुरु झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सेन्सॉर बोर्डावर सरकारने nonsense लोकांना नेमलं म्हणूनच ‘गोलपिठा’च्या माध्यमातून दलित अत्याचाराविरोधात विद्रोहाची तलवार उपसणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबाबतीत ‘कोण नामदेव ढसाळ?’ असं विचारण्याची त्यांची हिंमत झाली. म्हणूनच आपल्या अज्ञानातून ‘U’ टर्न घेण्यासाठी सरकारने sense असलेल्या लोकांनाच सेन्सॉर बोर्डावर नेमण्याची गरज आहे.
तर जितेंद्र आव्हाड यांनी कवितेतूनच उत्तर दिले आहे. सेन्सॉर बोर्ड मधला अधिकारी विचारतो कोण नामदेव ढसाळ…नामदेव ढसाळ म्हणजे कवी…नामदेव ढसाळ म्हणजे आग…नामदेव ढसाळ म्हणजे बंडखोर….नामदेव ढसाळ म्हणजे प्रस्थापितांचा काळ….नामदेव ढसाळ म्हणजे पँथर….नामदेव ढसाळ म्हणजे समाज व्यवस्थेविरोधात उभा ठाकलेला विद्रोह…नामदेव ढसाळ म्हणजे पोयेट ऑफ द इग्नोर्ड एंड डिप्रेस्ड क्लास….सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना थोडक्यात सांगतो….नामदेव ढसाळ म्हणजे बाप माणूस….आज ही तो तुम्हाला फाट्यावर मारतो