इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज पंचवटी येथे श्रीकाळाराम मंदिरात दर्शन घेतले. यावेळी आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज यांनी संकल्प पुजन करून शाल श्रीफळ महावस्त्र प्रसाद देऊन सत्कार केला आशिर्वाद दिला. तर विश्वस्त मंदार जानोरकर यांनी रामरायाची प्रतिमा भेट दिली.
कुंभमेळा तसेच मंदिर परिसर विकसित करणे बाबत काहीही मदत लागली तर मला अवश्य सांगा, महाराज मी सेवेसाठी तत्पर आहे असे आ. रोहित पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्यकारणी सदस्य व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सुधीरदास महाराजांनी प्रायागराज महाकुंभ पर्वणी करिता आमचा आखाड्यां बरोबर त्रिवेणी संगमावरती स्नान करण्यासाठी देखील त्यांना आमंत्रण दिले. आमदार रोहित पवार हे नाशिकमध्ये सुरु असलेल्या रणजी सामन्यांसाठी आले होते. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणीही भेटी दिल्या.
आजही अशीच अनुभूती आली – आ. रोहित पवार
प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पवित्र भूमीतील ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई आणि श्री लक्ष्मण यांचं मनोभावे दर्शन घेतलं. या पवित्र स्थळावरील भक्तिभाव आणि येथील अध्यात्मिक शांतता मनाला कायमच नवी ऊर्जा देणारी असते. यापूर्वी प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथील मंदिरात दर्शन घेतलं त्यावेळीही आणि आजही अशीच अनुभूती आली. यावेळी सर्वांना सुख समृद्धी लाभावी, अशी प्रार्थना प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणी केली.