इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेला संघर्ष त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पवार विरुध्द पवार लढत सर्वत्र चर्चेची ठरली. लोकसभेत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने बाजी मारली. तर विधानसभेत अजित पवार गट सरस ठरला. पण, आता निवडणुका संपल्यानंतर पवारांमधील संघर्ष थोडा कमी होतांना दिसत आहे. त्यात हे दोन्ही एकत्र येण्याची सुध्दा चर्चा असते. काल नागपूरमध्ये दोन पवार एकत्र दिसले व त्याची सुध्दा चर्चा रंगली. उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार रोहित पवार यांची ही भेट होती.
या भेटीवर रोहित पवार यांनी सांगितले, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ज्यांना कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा दिल्या ते अजितदादा यांना भेटून अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या. या टर्ममध्येही ते आपल्या कामाची धडाडी दाखवून देतील आणि राज्याची सेवा करतील, असा विश्वास आहे. यावेळी मंत्री शंभूराज देसाई हे सुध्दा उपस्थित होते.