मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २.४० कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे २.०२ कोटी… वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, ७८ लाख, ४४ लाख अणि ७९ लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर २०२३ मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेबर २०२३ मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते.
तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं!