इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी जोपर्यंत देशातील १४० कोटी नागरिक देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला धर्म मानत नाही, तोपर्यंत अशा गोष्टी होत राहतील असे वक्तव्य पहलगाम हल्यावर प्रतिक्रिया देतांना केले. या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गोयल यांच्यावर जोरदार टीका केली.
रोहिणी खडसे म्हणाल्या की, केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणतात की जनतेच्या चुकीमुळे हल्ला झाला. हल्ला झाला तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती? सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती? गेल्या १० वर्षे संपूर्ण बहुमताचे सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपवू शकले नाही? या प्रश्नांचे उत्तर तर मिळालेच नाही. उलट आता केंद्रीय मंत्री सामान्य जनतेवर खापर फोडत आहे. केंद्रीय मंत्र्यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. खरंतर यांचा राजीनामाच घ्यायला हवा.
यावेळी आमदार चित्रा वाघ यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचाही रोहिणी खडसे यांनी समाचार घेतला. आमदार झाल्या पण काम ट्रोल आर्मीचं करत आहेत! पहिल्याच वाक्यात अप्रत्यक्षपणे पवार साहेबांच्या वयावर बोलले जात आहे. कधी काळी पवार साहेबांना या बाप म्हणायच्या आज त्यांनाच वयावरून बोलले जात आहे. भाजपात हे नव्याने शिकवले जात आहे बहुतेक. गरज सरो आणि वैद्य मरो या वृत्तीचं काटेकोरपणे पालन झालंय…