इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी ! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय… याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आमदार चित्रा वाघ यांना सूनावलं
त्या म्हणाल्या की , तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते.
चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. विचारा तुमच्या वरिष्ठांना… शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. यात कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही ! त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला… उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको….
माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी ! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय… याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं…
तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते.
चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधान परिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. विचारा तुमच्या वरिष्ठांना… शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकापर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. यात कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही ! त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला… उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको….
नेमका वाद काय
दिशा सालियन प्रकरणात आमदार अनिल परब आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावेळी वाघ यांनी परब यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधतांना रोहिणी खडसे यांनी बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!! अशी टीका केली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसे यांना उत्तर देतांना म्हटले की, वडील विधान परिषदेत माझ्या समोर बसतात. त्यांनी त्यांना विचारावं, ते जास्त चांगलं सांगतील अशी प्रतिक्रिया दिली होती.