गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एक खून माफ करा…रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना लिहलेले पत्र चर्चेत….

by Gautam Sancheti
मार्च 8, 2025 | 12:28 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
ICGOn rS 400x400

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिणी खड़से खेवलकर यांनी राष्ट्रवतींकडे एक पत्र लिहून एक खून माफ करण्याची मागणी केली आहे. रोहिणी खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या आहे. त्यांनी ही मागणी केल्यामुळे त्यावर जोरदार प्रतिक्रियाही उमटल्या आहे. त्यांनी या मागणीच्या पत्राची पोस्ट सोशल मीडियावरही टाकली आहे. त्यात त्यांनी ही मागणी का केली त्याबद्दल सविस्तर लिहले आहे.

रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना लिहलेले हे पत्र
मा. द्रौपदी मूर्मू
राष्ट्रपती, भारत
@rashtrapatibhvn

विषय :- एक खुन माफ करणेबाबत

महोदया,
सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा मागून वरील मागणी करत आहे. कारणही तसेच आहे…

आज देशात महिला मोठ्या प्रमाणात असुरक्षित आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. दोनच दिवसांपूर्वी पूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एका १२ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आले. राष्ट्रपती महोदया, १२ वर्षीय ! विचार करा काय परिस्थिती असेल ?

नुकताच वर्ल्ड पॉपुलेशन रिव्यू सर्व्हे आला आहे अशा बातम्या आम्ही वाचल्या. या सर्व्हेमध्ये महिलांसाठी असुरक्षित असलेल्या जगातील विविध देशांचा उल्लेख केला आहे. या सर्व्हे नुसार आशिया खंडात भारत सर्वात असुरक्षित देश असल्याचे म्हटले गेले आहे. महिलांचे अपहरण, महिला बेपत्ता होण्याचे प्रकार, घरगुती हिंसाचार आणि अन्य गंभीर विषयांचाही समावेश आहे त्यामुळे आम्हाला एक खुन माफ करा अशी आम्ही समस्त महिलांच्या वतीने मागणी करतो.

आम्हाला खुन करायचा आहे अत्याचारी मानसिकतेचा, बलात्कारी प्रवृत्तीचा, निष्क्रिय असलेल्या कायदा सुव्यवस्थेचा. महोदया, आपल्या राज्यावर, देशावर संकट आले म्हणून महाराणी ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तलवार उपसली होती मग आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही का मागे राहावे.

आमच्या मागणीचा यथोचित विचार करून आपण आमची मागणी मान्य कराल ही अपेक्षा करते. हीच तुमच्याकडून आम्हाला जागतिक महिला दिनाची भेट समजू

धन्यवाद!
सौ रोहिणी खड़से खेवलकर
प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

मा. द्रौपदी मूर्मू
राष्ट्रपती, भारत @rashtrapatibhvn

विषय :- एक खुन माफ करणेबाबत

महोदया,

सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश म्हणून ओळखला जातो. जे शांतीचे अहिंसेचे मोठे प्रतीक आहे तरी आपली क्षमा… pic.twitter.com/bE8JMogdZ7

— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 8, 2025
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाल्मीक कराड याच्या कडुन १५ लाख रुपये खंडणी घेणार कोण? ..जितेंद्र आव्हाड यांनी दिली ही माहिती

Next Post

मृत लष्करी अधिका-याच्या भूखंडाची केली परस्पर विक्री…गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
fir111

मृत लष्करी अधिका-याच्या भूखंडाची केली परस्पर विक्री…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

IMG 20250807 WA0307 2

या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा सर्वोत्कृष्ट तर ही नाट्यकृती द्वितीय

ऑगस्ट 7, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

लाडक्या बहिण योजनेचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली ही माहिती

ऑगस्ट 7, 2025
daru 1

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तिघांनी रिक्षाचालकास जीवे मारण्याचा केला प्रयत्न…भगूर येथील घटना

ऑगस्ट 7, 2025
crime1

दारू दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखाची रोकड केली लंपास…जेलरोड भागातील घटना

ऑगस्ट 7, 2025
Untitled 9

निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निवडणूक कशी चोरली? राहुल गांधीचा गंभीर आरोप

ऑगस्ट 7, 2025
Untitled 6

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत विशेष पाठपुरावा…

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011