इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टीत पोलिसांनी छापेमारी करुन ३ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतले असून त्यात एकनाथ खडसे यांचा जावई प्राजंल खेवलकर यांना सुध्दा या प्रकरणात अटक झाली. त्यानंतर आता २४ तासानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिण खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियात फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल…जय महाराष्ट्र!
पतीला अटक झाल्यानंतर रोहिण खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली नव्हती. त्यामुळे त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काल प्राजंल खेवलकर यांना फ्लॅटमध्ये पार्टी करताना पोलिसांकडून अटक करण्यात आली. खराडी येथील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ही पार्टी सुरु होती. यात प्राजंल यांचा एक मित्र आमित तीन महिला पार्टीत सहभागी झाल्या होत्या. या पार्टीत दारु, हुक्का, आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचा पोलिसांनी दावा केला आहे.
प्राजंल खेवलकर यांच्याच नावाने हॅाटेलमध्ये रुम बुक करण्यात आले होते. रोहिणी खडसे यांचे पती अशलेले खेवलकर हे व्यावसायिक असून त्यांचे कामानिमित्त कायमच पुण्याला येणे जाणे सुरु असायचे. घटस्फोटानंतर रोहिणी खडसे यांनी प्रांजल खेवलकरसोबत लग्न केले.