जळगाव – ओबीसी आरक्षणासाठी भाजपने आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले असतांना दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या आंदोलनाबाबत ट्विट करत भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थितीत केले आहे. ओबीसी आंदोलन करताना माननीय खडसे. मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला हे पण, सांगा असा सवालही त्यांनी ट्विट मध्ये केला आहे. तर दुस-या ट्विटमध्ये भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही असे सांगत हल्लाबोल केला आहे.
तर तिस-या ट्विट मध्ये आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना ? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते. असा प्रश्नही उपस्थितीत केला आहे.
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या जेष्ठ कन्या असून त्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन आहेत. भाजपने एकनाथ खडसे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून तिकीट नाकारुन रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. पण, त्यात त्या पराभूत झाल्या. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे सुध्दा राष्ट्रवादीत गेल्या.
https://twitter.com/Rohini_khadse/status/1408647087693058049?s=20
https://twitter.com/Rohini_khadse/status/1407946496369041412?s=20
https://twitter.com/Rohini_khadse/status/1408353235551678464?s=20