धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते. धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवसस्थानापासून निघणार आहे. एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंत्यदर्शन शनिवार २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल अशी माहिती काँग्रेसतर्फे देण्यात आली.