इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने सध्या सर्व काही शक्य आहे, असे म्हटले जाते. आजकाल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणतंही काम करता येऊ शकते. रोबोट हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. सध्याचं युग तंत्रज्ञानाचे असल्याने त्याचा वापरही वाढला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक खेळ प्रगत झाला आहे. त्यामध्ये यंत्रांचा हस्तक्षेप देखील वाढत आहे. क्रिकेट असो, इतर कोणताही खेळ असो, सर्वत्र यंत्रांचा वापर वाढला आहे.
एखाद्या सरावाच्या वेळी, गोलंदाज नसला तरी चालेल, कारण अनेक प्रकारची प्रगत गोलंदाजी मशीन उपलब्ध आहेत आणि त्यांना यॉर्कर्स, शॉर्ट पिच किंवा बाऊन्सरसाठी ठराविक गतीने सेट करता येते. असाच बदल बुद्धिबळातही पाहायला मिळत आहे. तुमचा जोडीदार नसल्यास बोर्डवरील रोबोट तुमच्यासोबत गेम खेळू शकतो. पण, याच तंत्रज्ञनाचा उपयोग एका चिमुकल्याला अपघात घडला व त्याला दुखापतही झाली आहे. नेमके काय झाले? याविषयी सविस्तर जाणून घेऊ..
आधुनिक तंत्रज्ञानातील बदल किती घातक ठरू शकतो, याचे उदाहरण एका रोबोटनं 7 वर्षांच्या बालकाचे बोट तोडले, ही वेदनादायक घटना रशियातील एका स्पर्धे दरम्यानची आहे. बुद्धीबळ खेळताना रोबोटने मुलाला गंभीर जखमी केले. रोबोटने मुलाचे बोट तोडले. मॉस्कोमध्ये मॉस्को चेस ओपनमध्ये मुले रोबोट्ससोबत बुद्धिबळ खेळत आहेत.
विशेष म्हणजे यामध्ये टेबलावर खेळणाऱ्या रोबोटने बसलेल्या मुलाचे बोट पकडले. बराच वेळ दाबून ठेवले. या क्षणाचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. रोबोटने मुलाचे बोट 17 सेकंद धरल्याचे स्पष्टपणे दिसून येते. मूल वेदनेने रडताना दिसत आहे. आजूबाजूला असलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि कसंतरी मुलाचं बोट रोबोटच्या हातातून काढले. पण, यामुळे त्या चिमुकल्याला मोठा त्रास सहन करावा लागला.
त्या छोट्या मुलाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संदर्भात आयोजकांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे निवेदन प्रसिद्धीस दिले. हा रोबोट भाड्याने घेतला होता. यात आयोजकांचा दोष नाही. दुसरीकडे मुलाचे पालक आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, हा घडलेला धक्कादायक प्रकार गंभीर असून लहान मुल असताना अशा प्रकारचा निष्काळजीपणा धक्कादायक आहे. (बघा या घटनेचा हा व्हिडिओ)
https://twitter.com/xakpc/status/1550224137041371144?s=20&t=RF3RCV9uKzpzMw1fUsT-LQ
Robot Break Finger of 7 year Old Child in Chess Competition