इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही वर्षांपूर्वीच्या एका हिंदी चित्रपटात अभिनेते कादर खान यांचा डायलॉग होता, एका खेडे गावात आलेल्या एका परदेशी व्यक्तीला ते सांगतात की, ‘हमारे यहाँ सडक बनते या नही! ये मालूम नही, लेकिन उसका उद्घाटन तथा अनावरण जरूर हो जाता हैI’ सध्या प्रत्यक्षात देखील अनेक वेळा रस्त्याचे काम होण्यापूर्वीच त्या ठिकाणी फलक लागलेले दिसतात, परंतु त्यानंतर काही का होत नाही ! थातूरमातूर त्या रस्त्याचे काम होते, नंतर तो रस्ता पुन्हा एकदा खड्डा मय होता आणि येथे रस्ता होता? किंवा रस्ता दुरुस्त केला होता? रस्त्याचे डांबरीकरण झाले होते? याचे नामोनिशाण देखील राहत नाही. उत्तर प्रदेशात असाच काहीसा अजब प्रकार घडला.
येथे तर रस्ता तयारच केला नाही किंवा त्याची डांबरीकरण देखील झाली नाही परंतु त्या ठिकाणी कोनशिला मात्र लागली विशेष म्हणजे या कोनशिलेवर राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री, आमदार खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे देखील यात दिसून येतात, या गैरप्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय यांच्या हस्ते मथुरा जिल्ह्यातील संख भागातील नागला बेरू गावात न बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात रस्त्याच्या उद्घाटनाचा दगडी नामफलकही लावला आहे. आता याबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी भाजपचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन आणि पायाभरणीची धूम सुरू केली आहे . लखनौमध्ये बसून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय यांनीही न बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन केले. रस्त्याच्या उद्घाटनाचा फलक हेच दर्शवत आहे. विशेष म्हणजे या दगडी फलकावर खासदार आणि आमदारांचीही नावे आहेत, यात खासदार हेमा मालिनी आणि आमदार करिंदा सिंग यांचीही नावे दगडी फलकावर कोरलेली आहेत. नागला बेरू येथील चार किमी लिंक रोडच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी शासनाकडून 23 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, आजतागायत येथे दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. पावसामुळे नागला बेरू गावाकडे जाणारा रस्ता जलमय होत असते.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम न करता कामाचे उद्घाटन करण्याचा फलक लावला. आता गावातील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रत्यक्ष रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे. मथुरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता म्हणाले की, रस्त्याच्या बांधकामाचे काम पूर्ण होण्यापूर्वी उद्घाटन करता येत नाही. दगडी फलक बनवताना चूक झाली असावी. मंत्र्यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली, याची चौकशी होणे आवश्यक आहे,