लखनऊ – मोबाईल हा जणू व्यसन झाला आहे. त्याच्याशिवाय एक क्षणही जवळपास सर्वांनाच करमत नाही. ड्रायव्हिंग करताना असो स्वयंपाक बनविताना की जिने उतरताना अशा नको त्या वेळीही मोबाईलवर बोलण्याची सवय अनेकांना लागली आहे. लखनऊ येथे असाच एक प्रकार घडला आहे. रस्ता ओलांडताना मोबाईलवर बोलणाऱ्या व्यक्तीला एका कारने जोरदार धडक दिली आणि ती व्यक्ती तब्बल ८ फूट उडाली. या व्यक्तीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघाताचा हा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यातून सर्वांनी धडा घेण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
बघा हा थरारक व्हिडिओ
मोबाइल पर बात करते सड़क पार करना…ना बाबा ना…। आप देखें, सहम जाएंगे। जिंदगी न मिलेगी दोबारा…।
आंखें खोलने वाला यह खौफनाक हादसा लखनऊ के आलमबाग (बाराबिरवा) का है।@dainikjagranlko @JagranNews #Lucknow#nomobilewhiledriving pic.twitter.com/echbn7jOzS— Pawan Tiwari?? ?? (@pawan_pawant) August 5, 2021