इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पंतप्रधान मोदींच्या बंगळुरू दौऱ्यापूर्वी २३ कोटी खर्चून बांधलेला हा रस्ता एक पाऊसही तग धरू शकला नाही. ग्रेटर बंगळुरू महानगरपालिकेने नुकताच रस्ता बांधला. महानगरपालिकेने हा ३.६ किमीचा रस्ता बनवला होता जो बेंगळुरू विद्यापीठ परिसराचा भाग आहे. पंतप्रधान मोदी सोमवारी याच रस्त्यावरून डॉ भीमराव आंबेडकर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये पोहोचले होते.
रात्रीच्या पावसानंतर हा रस्ता बसला. रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता. ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे ती जागा विद्यापीठ परिसराजवळ आहे. या नव्या रस्त्याची अवस्था पाहून रस्त्यावरून जाणारे लोक आश्चर्यचकित होऊन व्यवस्थेला शिव्या देत निघून जातात.
येथून जाणारे अनंत सुब्रमण्यम म्हणाले, “येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी अनेकदा तक्रार केली होती, पण कोणीही ऐकायला तयार नव्हते. दुसरा पर्याय नसल्याने खड्ड्याजवळ बॅरिकेड लावण्यात आले. रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पंतप्रधान मोदी एप्रिलमध्ये दौऱ्यावर येणार होते. त्यानंतरही रस्ता बांधण्यात आला होता पण पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला होता. काही दिवसातच रस्त्याची अवस्था बिकट होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले होते.
पाण्याची गळती किंवा सांडपाण्याची पाइपलाइन फुटल्याने हा खड्डा पडला असल्याचे पालिका अभियंत्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली. विशेष आयुक्त बीबीएमपी म्हणाले, प्रोटोकॉलमुळे मजुरांनी दिवसरात्र एक करून हा रस्ता तयार केला होता.
road-construction-for-pm-modi-rain-damage Bengaluru 6 crore