गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – काही युवकांना स्टंटबाजी चांगलीच महागात पडली आहे. पावसामध्ये कारच्या खिडकीबाहेर येऊन स्टंट केल्या प्रकरणी तीन कारमधील युवकांना वाहतूक पोलिसांनी ६२ हजारांचा दंड ठोठावला आहे.
येथील विजयनगर पोलिस ठाणे हद्दीत रविवारी (८ ऑगस्ट) पाऊस पडत असताना तीन कारमध्ये बसून काही युवक महामार्गावर निघाले. हुल्लडबाजी करत कारच्या खिडकीबाहेर येऊन स्टंट करत होते. स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्या आधारावर तिन्ही कारची ओळख पटवून दंडाची पावती फाडली.
वाहनांना लावलेला दंड असा
१) सूरजपाल सिंह – वाहन क्रमांक यूपी १४ बीएच ०८०१
राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सार्वजनिक स्थळी स्टंट करणे ५००० रुपये दंड
विनापरवाना वाहन चालविणे ५००० रुपये दंड
ध्वनि प्रदूषण निकषांचे उल्लंघन १०००० रुपये दंड
विनाविमा वाहन चालविणे २००० रुपये दंड
एकूण दंडाची रक्कम २२ हजार रुपये
२) राहुल नागर – वाहन क्रमांक यूपी १४ सीके ००८४
राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सार्वजनिक स्थळी स्टंट करणे ५००० रुपये दंड
विनापरवाना वाहन चालविणे ५००० रुपये दंड
ध्वनि प्रदूषण निकषांचे उल्लंघन १०००० रुपये दंड
एकूण दंडाची रक्कम २० हजार रुपये
३) शेखर कुमार – वाहन क्रमांक एचआर ५१ एई ५२००
राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सार्वजनिक स्थळी स्टंट करणे ५००० रुपये दंड
विनापरवाना वाहन चालविणे ५००० रुपये दंड
ध्वनि प्रदूषण निकषांचे उल्लंघन १०००० रुपये दंड
एकूण दंडाची रक्कम २० हजार रुपये
व्हायरल व्हिडिओत काय
व्हायरल व्हिडिओ प्रताप विहार पोलिस चौकीजवळचा आहे. पाऊस पडत असताना काही वाहने सायरन वाजवत धावत आहेत. वाहनांच्या चारही खिडक्या उघड्या आहेत. प्रत्येक खिडकीत एक युवक बसलेला आहे. प्रत्येक युवक खिडकीबाहेर डोकावून हुल्लडबाजी करत आहेत. दोन कार गाझियाबादच्या, तर एक हरियाणाची कार आहे.