इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रस्त्यांवर नेहमीच विविध अपघात होत असतात. आताही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एक मोठा अपघात झाला आहे. एका धावत्या ट्रकला अचानक आग लागली. हा ट्रक चारा घेऊन जात होता. रात्रीच्या सुमारास या ट्रकला महामार्गावर मोठी आग लागली. तरीही वाहनचालक अर्ध्या किलोमीटर पर्यंत हा ट्रक चालवत होता. याचदरम्यान महामार्गावरील सर्व वाहतूकदार हा धावता पेटलेला ट्रक पाहत होते. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
https://twitter.com/BHARATGHANDAT2/status/1487448060024463363?s=20&t=iwVY1HdXK9QYpjJeWhTsQA