नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाच काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा येथे केली .राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या द्वारे राष्ट्रीय महामार्ग 53 वरील भंडारा बायपास तसेच मौदा वाय जंक्शन येथील सहा पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच भंडारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या मार्गांचे डांबरीकरण तसेच मजबूतीकरणाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आज भंडारा येथील महश्री विद्यामंदिर मैदान अशोकनगर येथे त्यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते .याप्रसंगी भंडारा-गोंदिया गोंदियाचे खासदार डॉ . प्रशांत पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग-53 वरील 14.8 किमी लांब भंडारा बायपास भंडारा शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक होता.नागपूर-रायपूर-कोलकाता मार्गावरील जड वाहने यापुर्वी भंडारा शहरातील दुपदरी मार्गावर जात होते.ज्यामुळे अधिक विलंब व अधिक इंधन खर्च होऊन अपघातांचा धोका निर्माण होत होता. भंडारा बायपासमुळे वाहतुक सुलभता होईल, असे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
भंडारा बायपास हा हरीत क्षेत्र ग्रीनफील्ड मध्ये अंशिक एक्सेस नियंत्रण,सर्विस रोड्स,उड्डणपुल आणि अंडरपास सह तयार करण्यात आलेला आहे.ज्यामुळे स्थानिक आणि दुरच्या वाहतुकीच्या प्रवासाचे विभाजन करुन प्रवास सुरळीत करतो.यासोबत वन्यप्राणी व वाघांच्या मार्गाचा विचार करुन अंडरपास,ध्वनी अवरोधक सोबत चेन लिंक फेसिंग यांचा समावेश केलेला आहे.
आज मानेगाव येथील व्हेहीकुलर ओवरपास व ब्लॅक स्पॉट सुधारणा लांबी -1.9 कि.मी,बपेरा ते तुमसर राज्य मार्ग लांबी 18 कि.मी आणि खापा ते भंडारा राज्य मार्गाचे डांबरीकरण व मजबुतीकरण लांबी 28 कि.मी या तीन कामाचे डिजीटल भुमीपुजन संपन्न झाले.तसेच भंडारा बायपास व मौदा वाय जंक्शन 6 लेन उडडाणपुल या दोन विकासकामांचे डिजीटल लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले.सकाळी वैनगंगा नदीवर जलपुजन व भंडारा बायपासची पाहणी केल्यानंतर महर्षी विदयामंदीर येथील कार्यक्रमास ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी एच.एम.सिन्हा यांनी केले. तत्पुर्वी आज सकाळी नागपूर जिल्ह्याच्या भंडारा रोडवरील मौदा वाय जंक्शन येथे असलेल्या सहा पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण केले .या पुलाची लांबी 1.44 किलोमीटर असून सुमारे 84 कोटी रुपयांच्या तरतुदीने हा पूल बांधण्यात आला आहे .या उड्डाणपुलामुळेमौदा वाय जंक्शन वरील वाहतुकीमध्ये सुधारणा येऊन येथील दुर्घटना टळणार आहेत. यावेळी त्यांनी उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी केली यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे तसेच विधान परिषदेतील आमदार परिणय फुके उपस्थित होते.