नवी दिल्ली -फ्रान्समधील ब्रेस्ट येथील बंदराची भेट पूर्ण केल्यानंतर आयएनएस तबर या भारतीय युद्धनौकेने १५ आणि १६ जुलै रोजी बिस्केच्या उपसागरात एफएनएस ॲक्वीटेन या फ्रेंच नौदलाच्या लढाऊ नौकेसोबत संयुक्त सागरी सराव केला. एफएनएस ॲक्वीटेन वरील जुळी इंजिने असलेले एनएच ९० हेलिकॉप्टर आणि फ्रेंच नौदलातील चार राफेल लढाऊ विमानांनी देखील या सरावात भाग घेतला.
पाणबुडी-विरोधक, पुष्ठ्भागावरील विविध कार्ये, समुद्रातील पुनर्भराव पैलू, लक्ष्यावरील मारा, नौकेवरील शोध आणि जप्ती, स्टीम पास्ट, हवाई मारा, हवाई चित्र संकलन, उभ्या पद्धतीने पुनर्भराव आणि नौकांवरील परस्पर व्यवहार इत्यादी विविध प्रकारच्या कार्यांचा सराव या नौकांनी केला. दोन्ही नौदलांचे आंतर-परिचालन वाढविणे आणि सागरी क्षेत्रातील धोक्यांविरुद्ध संयुक्त कारवाईच्या दृष्टीने एकत्र येणे यासाठी असे सराव दोन्ही देशांसाठी अत्यंत लाभदायक ठरतात.