मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (RBL) इटलीच्या “प्लास्टिक लेग्नो S.p.A.” च्या भारतीय खेळणी उत्पादन व्यवसायात 40% हिस्सा घेणार आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये संयुक्त उपक्रमाची व्यवस्था करण्यात आली. रिलायन्स ब्रँड्सच्या या गुंतवणुकीमुळे कंपनीच्या खेळण्यांचा व्यवसाय आणखी मजबूत होईल. रिलायन्स ब्रँड्स लिमिटेड (RBL) ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
आरबीएल चे खेळणी उद्योगात मजबूत अस्तित्व आहे. तिच्या पोर्टफोलिओमध्ये हॅम्लेज आणि घरगुती खेळण्यांचा ब्रँड – रोवन यांचा समावेश आहे.हॅम्लेज चे सध्या 15 देशांमध्ये 213 स्टोअर्स आहेत. ही भारतातील खेळण्यांच्या दुकानांची सर्वात मोठी साखळी आहे.
रिलायन्स ब्रँड्स लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले की, हे माननीय पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. प्लॅस्टिक लेग्नोच्या जागतिक दर्जाच्या खेळण्यांच्या उत्पादनातील सखोल अनुभवामुळे, जागतिक खेळण्यांच्या किरकोळ उद्योगात आमचे मजबूत पाऊल भारतात बनवलेल्या खेळण्यांसाठी नवीन दरवाजे आणि अनोख्या संधी उघडतील. यामुळे देशात केवळ देशांतर्गत वापरासाठीच नव्हे तर जागतिक बाजारपेठेसाठीही मजबूत खेळणी उत्पादन परिसंस्था निर्माण होईल.
प्लॅस्टिक लेग्नो एस पी ए ची मालकी सॅनिनो ग्रुपच्या मालकीची आहे, ज्यांना युरोपमध्ये खेळण्यांच्या उत्पादनाचा २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. वाढत्या भारतीय खेळण्यांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या आणि खेळण्यांच्या बाजारपेठेसाठी भारताला जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने समूहाने 2009 मध्ये देशात व्यवसाय सुरू केला.
सुनिनो ग्रुप चे सहमाल्क पाओलो सुनिनो म्हणाले “आम्हाला या संयुक्त उपक्रमात RBL एक भागीदार म्हणून मिळाल्याचा अत्यंत अभिमान वाटतो. आम्हाला खात्री आहे की खेळण्यांच्या उत्पादनातील प्लास्टिक लेग्नोचा अनुभव आणि हॅमलीजची व्यावसायिक पोहोच संयुक्त उपक्रम कंपनीला अधिक उंची आणि यश मिळविण्यास सक्षम करण्यासाठी एकमेकांना पूरक ठरेल. आमच्याकडे भारतासाठी महत्त्वाच्या विकास योजना आहेत. आम्ही भविष्यातील आव्हानांसाठी तयार आहोत, परंतु जेव्हा RBL सारखा समूह एकत्र येतो तेव्हा आम्हाला विश्वास आहे की एकत्र येऊन आम्ही फरक करू शकतो.”