नाशिकरोड – नाशिकच्या बाल येशू मंदिराला सिने अभिनेता रितेश देशमुख व त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा देशमुख यांनी सोमवारी सकाळी भेट दिली. पण, याबाबत कोणालाही फारशी माहिती नसल्यामुळे त्यांनी या परिसरात निवांतपणे त्यांनी काही वेळ घालवला. नेहमीच सोशल मीडियावर दिसणारे हे जोडपे काही ना काही गमंती – जमंती करत असतात. त्यांचे व्हिडिओ सुद्दा आता प्रक्षेकांच्या पसंतीस उतरले आहे. अशी ही जोडी नाशिकला आल्यानंतर मात्र सर्वच अनभिज्ञ होते.
रितेश बरोबर त्याचे सासरे निल डिसोजा सासू जेनीती डिसूजा हे सुध्दा होते. यावेळी सर्वांनी प्रार्थना केली त्यानंतर येथील फादर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. गेल्या वर्षी करीना व करिष्मा कपूर यांनी बाल येशू मंदिरात येऊन भेट दिली होती. आता देशमुख परिवाराने ही भेट दिली. डिसूजा परिवार मात्र नियमीतपणे या ठिकाणी येत असतात. नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेवियर्स हायस्कुल जवळ असलेले बालयेशू मंदिर हे देशात प्रसिध्द असे धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. देशविदेशातील ख्रिस्ती बांधवासह भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यात्रा उत्सवाच्या काळात या ठिकाणी सर्व भाषेतून प्रार्थना केल्या जातात. या चर्चचे फादर ऑगस्टीन यांनी यावेळी उपस्थितीत होते.