इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित आहे. ऋषी सुनक हे २०१५ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. ते रिचमंड, यॉर्कशायर येथून निवडून आले. सुनक कंझर्व्हेटिव्ह पक्षात झपाट्याने वाढला. त्यांनी ‘ब्रेक्झिट’ला पाठिंबा दिला. त्यांनी ‘EU सोडा’ मोहिमेदरम्यान बोरिस जॉन्सन यांना पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे, भारतीयांना दिवाळीचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. कारण, ज्या ब्रिटनने भारतावर राज्य केले त्याच देशावर आता भारतीय वंशाची व्यक्ती राज्य करणार आहे.
ऋषी सुनक यांनी आपले प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डंटला मागे टाकले आहे. त्यांना संसदेच्या १४२ सदस्यांचा पाठिंबा आहे. पंतप्रधान होण्यासाठी फक्त १०० सदस्यांचे समर्थन आवश्यक आहे. आपल्या उमेदवारीची घोषणा करताना ते म्हणाले की त्यांना “देशाची अर्थव्यवस्था सुधारायची आहे, त्यांच्या पक्षाला एकत्र करायचे आहे आणि देशासाठी काम करायचे आहे”.
माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी रात्री पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली, कारण परतण्याची ही “योग्य वेळ नाही”. यानंतर ऐन दिवाळीत सुनक यांच्या पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची घोषणा करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या पक्ष नेतृत्वाच्या निवडणुकीत सुनक यांना माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. ट्रस यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षातील त्यांच्या नेतृत्वाविरुद्ध उघडपणे बंड केल्यानंतर अवघ्या ४५ दिवसांनी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा जाहीर केला. “मी तुम्हा सर्वांना विनंती करत आहे की मला आमच्या समस्या सोडवण्याची संधी द्या,” सुनक यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचार मोहिमेत सांगितले.
https://twitter.com/HertsMercury/status/1584536053574164480?s=20&t=zS9svXOqM9nJ_6JDMb-4Ew
Rishi Sunak Will Soon Become Britain PM