इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या मर्सिडीज जीएलई एसयूव्ही (मर्सिडीज जीएलई एसयूव्ही) कारला भीषण अपघात झाला. या कारने पेटही घेतला. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रुरकीजवळ दुभाजकाला धडकल्याने काही क्षणातच कारला आग लागली. आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. आगीपासून वाचण्यासाठी ऋषभ पंतने कारची खिडकी तोडली. स्थानिक रहिवासी आणि प्रत्यक्षदर्शींनी त्याला वेळीच मदत केली. या अपघातात पंत जखमी झाला आहे. मात्र, या अपघातातून एक प्रश्न अनेकांना पडला आहे तो म्हणजे महागडी आणि आलिशान कार असूनही तिने पेट का घेतला.
हाय-स्पीड आघातानंतर कारला आग लागणे असामान्य नाही. सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट होते की गाडी चालवताना पंतला डुलकी लागली. त्यावेळी कारचा वेग जास्त होता. आधुनिक कार असली तरी अशा घटनांनंतर आग लागण्याची शक्यता जास्त असते. कारण या गाड्या बनवण्यासाठी प्लास्टिक, फोम, इलेक्ट्रिकल वायर किंवा फॅब्रिकचा वापर केला जातो. मग समोरासमोर टक्कर झाल्यानंतर इंधन गळती होण्याची शक्यता नेहमीच असते. जास्त उष्णतेमुळे इंजिन किंवा बॅटरीला आग लागण्याचा धोका असतो. अशा घटनांच्या बाबतीत सुरक्षिततेचा उपाय म्हणून बहुतांश कारमध्ये अग्निशामक उपकरणे नसतात.
अपघात कधीही, कोणत्याही परिस्थितीत होऊ शकतो. अशा परिस्थितीत, काही पावले उचलली जाऊ शकतात. ज्यामुळे मृत्यू किंवा दुखापत होण्याची शक्यता कमी होऊ शकते. वेळीच खबरदारी घेतल्यास कारचे संपूर्ण जळणे देखील टाळता येऊ शकते. आग लागलेल्या परिस्थितीत प्रत्येकासाठी जळत्या वाहनातून बाहेर पडणे ही पहिली आणि प्रमुख प्राथमिकता असली पाहिजे. जळत्या कारमध्ये अडकल्यास, स्वतःला बाहेर काढण्यासाठी खिडक्या उघडण्यासाठी तीक्ष्ण वस्तू वापरा. आगीशी लढण्यासाठी प्राथमिक शस्त्र म्हणून अग्निशामक यंत्र असणे देखील जोखीम कमी करण्यात मदत करू शकते. कारमध्ये अनेक ज्वलनशील उपकरणे असतात ज्यामुळे लहान आग त्वरीत वाढू शकते आणि काही प्रकरणांमध्ये स्फोट देखील होऊ शकतो.
Rishabh Pant Car Accident Why Car Fire Burn
Automobile Mercedes Luxurious