इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विदेशी ब्रीडचे कुत्रे खरेदी करायचे असतील तर लाखो रुपये मोजणारे लोक आपण बघितले आहेत. तसेच मांजरींच्याही बाबतीत आहे. पण अमेरिकेतील कुत्रा आणि मांजरीची किंमत ऐकून तुम्हाला भोवळ येईल, अशी स्थिती आहे. एका कुत्र्याची किंमत तब्बल ४ हजार कोटी आणि मांजरीची किंमत ८०० कोटी रुपये आहे.
खरं तर काल्पनिक किंवा फिल्मी वाटावी, अशीच गोष्ट आहे. पण सोशल मिडीया स्टडीमध्ये ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आपण गमतीने म्हणतो की माणसाची काही किंमत राहिली नाही. पण इथे तर कुत्रा आणि मांजरीची किंमतच करोडोंमध्ये सांगितली जात आहे. ऑल अबाऊट कॅट्सच्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यातील एका कुत्र्याची किंमत तर हजारो कोटींमध्ये सांगण्यात आली आहे.
जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वांत महागडा प्राणी अमेरिकेची प्रसिद्ध गायक टेलर स्विफ्ट हिच्याकडे आहे. स्कॉटिश फोल्ड जातीचे एक मांजर तिच्याकडे आहे. तिचे नाव ऑलिव्हिया बेन्सन असे आहे. या मांजरीची किंमत ८०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. आहे ना गंमत. भारतात काही महानगरपालिकांचं वार्षिक बजेटही ८०० कोटी नसतं. त्यादृष्टीने या महापालिकांनी टेलर स्विफ्ट हिच्याकडलं मांजर खरेदी करतो म्हटलं तरी त्यांना शक्य नाही.
https://www.instagram.com/p/CHyVcrApLE0/?utm_source=ig_web_copy_link
सेलिब्रिटी व्हॅल्यू
ऑलिव्हिया बेन्सन हिची किंमत तिच्या मालकिणीमुळे आहे, हे सर्वांनाच कळलं असेल. पण असच आणखी एक मांजर आहे, जिची किंमत सुद्धा आठशे कोटींच्याच घरात आहे. तिचं नाव नाला असून इन्स्टाग्रामवर तिला ४४ लाख लोक फॉलो करतात.
४००० कोटींचा कुत्रा
जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा गुंथर महागड्या प्राण्यांच्या यादीत आघाडीवर आहे. त्याची मालकी एका इटालीयन कंपनीकडे आहे. आणि त्याची किंमत ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राणी किती कमावतात, याचा अंदाज लावणे तर केवळ अशक्य आहे.
https://twitter.com/Newsxinfo/status/1611604464120496128?s=20&t=i3H7s6tj8mwJoR-d5lynHg
Richest Pets in the world Dog and Car Crore Price
Animals