इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘नावात काय आहे?’ असे म्हटले जाते परंतु नावातच सर्व काही आहे, असे देखील काही जण म्हणतात. कारण प्रत्येक व्यक्तीला एक नाव असते त्या नावामुळेच ती व्यक्ती समाजात किंवा जगभरात ओळखला जाते. कोणी आपल्या मुलांचे नाव काय ठेवायचे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु काही नावे अशी चित्र विचित्र असतात की, हे वाचून आश्चर्य वाटते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क सातव्यांदा पिता झाले आहेत. त्यांची पत्नी सिंगर ग्रिम्स हिने एका मुलीला जन्म दिला आहे. त्या नवजात बाळाचे नाव खुपच विचित्र ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ही बाब जगभरात चर्चेची बनली आहे. मस्क दाम्पत्याने मुलीचे नाव एक्झा डार्क सिडरेल असे ठेवले आहे. याआधी दोघांना एक मुलगा आहे. ग्रिम्सने व्हॅनिटी फेअर मॅगझिनला मुलीच्या जन्माची माहिती दिली.
टेस्ला उद्योग समुहाचे सर्वेसर्वा असलेले एलन मस्क विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांची ३३ वर्षीय पत्नी ग्रिम्स पत्नी हिने सांगितले की, आमच्या मुलीचे नाव एक्झा डार्क सिडरेल (Exa Dark Sideril) असे ठेवले आहे. ती स्वतः आणि एलन आपल्या मुलीला Y नावाने हाक मारतील. व्हॅनिटी फेअर नुसार exa हा सुपर कॉम्प्युटिंग टर्म exaFLOPS चा संदर्भ देतो. डार्कचा अर्थ अंधार होतो, पण त्यांना काय अपेक्षित ते माहीत नाही.
ग्रिम्स म्हणाली की, काही नागरिकांना गडद बाबींची भीती वाटते. मात्र डार्क (गडद) पदार्थ हे आपल्या विश्वाचे सुंदर रहस्य आहे. ती म्हणाला की, सिडरेल म्हणजे विश्वाची अचूक वेळ, ताऱ्याची वेळ आणि पृथ्वीपेक्षा वेगळी असलेली खोल जागा होय. ग्रिम्सने सांगितले की, तिला तिच्या मुलीचे नाव ओडिसियस ठेवायचे आहे.
पण एलन मस्कने आपल्या मुलीचे नाव एक्झा डार्क सिडरेल असे ठेवले आहे. घरी मात्र त्यांच्या मुलीचे टोपण नाव वाय असेल. या दोघांच्या मुलाचे नाव देखील खूप विचित्र आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव XA-12 ठेवले. जेव्हापासून मस्कच्या सातव्या मुलाचे नाव समोर आले आहे, तेव्हापासून नेटिझन्सने मस्कला ट्रोल केले आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर मीम्स शेअर केले जात आहेत.
https://twitter.com/Forbes/status/1501986263246721028?s=20&t=5HuXtRJrB1aacOYMhcsrbw