शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

by Gautam Sancheti
मे 14, 2025 | 7:10 am
in संमिश्र वार्ता
0
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये मुंबईच्या परिना राहुल मदान पोटरा हिने 3 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके पटकावून आपली क्षमता सिद्ध केली. तिने केलेल्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

खेलो इंडिया युथ गेम्स 2025 अंतर्गत दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यांमध्ये देशातील तरुण जिम्नॅस्टिकस्‌नी कला, संतुलन आणि लयबद्धतेचा अप्रतिम संगम सादर केला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या परिना युवा खेळाडूने तीन सुवर्ण आणि दोन रौप्यपदक पटकावली तर दिल्लीची रेचलदीप हिने सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या.

रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या अंतिम सामन्यांमध्ये महाराष्ट्राने 5 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्यपदक आपल्या नावावर केले. तर दिल्लीने 1 रौप्य आणि 3 कांस्यपदके या स्पर्धेत मिळवली. हरियाणाने 1 कांस्य पदक मिळवण्यात यश मिळवले.

ऑल अराउंड फायनल: परिनाचे परफेक्शन, महाराष्ट्राचा दुहेरी विजय
31 जिम्नॅस्ट्कांमध्ये झालेल्या वैयक्तिक ऑल अराउंड फायनलमध्ये महाराष्ट्राच्या परिना हिने 83.650 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या सहकारी शुभाश्री उदयसिंह मोरे हिने 80.200 गुणांसह रौप्यपदक, तर दिल्लीच्या रेचल दीप हिने 75.850 गुणांसह कांस्यपदक मिळवले.

हूप इव्हेंट: परिनाचे दुसरे सुवर्ण, दिल्लीला रौप्य
हूप इव्हेंटमध्ये परिनाने आपला दबदबा कायम ठेवत दुसरे सुवर्णपदक जिंकले. दिल्लीच्या रेचल दीपने रौप्यपदक मिळवले, तर महाराष्ट्राच्या देवांगी हर्षल पवार हिला कांस्यपदक मिळाले.

बॉल इव्हेंट: किमायाने चमक दाखवली, परिनाला रौप्य
बॉल इव्हेंटमध्ये महाराष्ट्राच्या किमाया अमलेश कार्ले ने सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राच्या परिनाला रौप्य, तर दिल्लीच्या रेचलने यावेळी कांस्यपदकाची कमाई केली.

रिबन इव्हेंट: परिनाचे तिसरे सुवर्ण, दिल्ली पुन्हा कांस्यवर
रिबन इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा परिनाने लयबद्ध प्रदर्शन करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. शुभाश्री हिला रौप्य, तर रेचल दीपने पुन्हा कांस्यपदक जिंकून दिल्लीसाठी गौरव मिळवला.

क्लब्स इव्हेंट: शुभाश्रीने दाखवली ताकद, हरियाणाच्या मिष्काने मिळवले स्थान
क्लब्स इव्हेंटच्या अंतिम सामन्यात शुभाश्री ने सुवर्णपदक, परिनाने रौप्य आणि हरियाणाच्या मिष्का ने दिल्लीच्या रेचल दीपला मागे टाकत कांस्यपदक जिंकले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011