विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे देशात खळबळ उडाली असून यावर नियंत्रण ठेवण्याचे सर्व प्रयत्न कमी पडत असल्याचे सिद्ध होत आहे. याच वेळी नवीन संशोधनामुळे आशेचा नवा किरण दिसत आहे. काही शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, सामान्य सर्दीसाठी जबाबदार रायनो व्हायरस शरीरात प्रवेश करून कोरोनाला हरवू शकतो, तसेच या विषाणूच्या मदतीने कोविड -१९ चा धोका बर्याच प्रमाणात कमी करता येतो.
सायन्स ऑफ इन्फेक्टीव्ह डिसीज या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. कोरोनापासून वाचविणार रायनो विषाणू काय आहे, तो कसा काम करतो, हे जाणून घेऊ या…
कोरोनाला प्रतिबंध
ग्लासगोमधील सेंटर फॉर व्हायरस रिसर्चमधील पथकाने यावर संशोधन केले. या काळात, पेशी असलेली एक रचना तयार केली गेली, जी मानवी श्वसन प्रणालीच्या धर्तीवर कार्य करते. यामध्ये, सर्दी आजाराला कारणीभूत रायनोव्हायरस आणि कोरोना विषाणू दोन्ही एकाच वेळी सोडण्यात आले. या प्रयोगाच्या दरम्यान हे सिद्ध झाले की, रायनोव्हायरसने कोरोना विषाणूला जवळजवळ अप्रभावित केले.










