मंगळवार, ऑक्टोबर 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इथेनॉलच्या किमतीत सुधारणा करण्यास केंद्र सरकारने दिली मंजुरी…

जानेवारी 29, 2025 | 5:46 pm
in संमिश्र वार्ता
0
petrol diesel

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमांतर्गत 1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025 या इथेनॉल पुरवठा वर्ष 2024-25 साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांसाठी इथेनॉल खरेदी किमतीत सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार, इथेनॉल पुरवठा वर्ष 2024-25 (1 नोव्हेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2025) साठी C हेवी मोलॅसेस (CHM) द्वारे इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी इथेनॉल विक्रीची किंमत 56.58 रुपये प्रति लिटर ऐवजी 57.97 रुपये प्रति लीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे.

या मंजुरीमुळे इथेनॉल पुरवठादारांसाठी किंमत स्थिरता आणि रास्त दर प्रदान करण्यासाठी सरकारचे धोरण चालू ठेवण्यास केवळ मदत होणार नाही तर कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनात बचत करणे आणि पर्यावरणाला फायदा होण्यास मदत होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्वीप्रमाणेच जीएसटी आणि वाहतूक शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागणार आहे. सीएचएम इथेनॉलच्या किमती 3% ने वाढल्यामुळे वाढीव मिश्रणाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी इथेनॉलची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल.

सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाची अंमलबजावणी करत आहे ज्यामध्ये तेल विपणन कंपन्या 20% पर्यंत इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्री करत आहेत. पर्यायी आणि पर्यावरण-स्नेही इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम देशभरात राबवण्यात येत आहे. या निर्णयामुळे ऊर्जेच्या गरजा भागवण्यासाठी आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कृषी क्षेत्राला देखील चालना मिळेल. गेल्या दहा वर्षांत (31.12.2024 पर्यंत) सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे सुमारे 1,13,007 कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत झाली आहे आणि सुमारे 193 लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाला पर्याय उपलब्ध झाला आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे (ओएमसी) केले जाणारे इथेनॉल मिश्रण, इथेनॉल पुरवठा वर्ष 2013-14 (ईएसवाय – सध्या वर्षातील 1 नोव्हेंबर ते पुढील वर्षाच्या 31 ऑक्टोबरपर्यंत इथेनॉल पुरवठा कालावधी म्हणून परिभाषित केले आहे) मधील 38 कोटी लिटरवरून ईएसवाय 2023-24 मध्ये सरासरी मिश्रणाची 14.60% टक्केवारी गाठत 707 कोटी लिटर इतके वाढले आहे.

सरकारने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य 2030 वरून ईएसवाय 2025-26 पर्यंत आणले आहे, आणि “भारतातील इथेनॉल मिश्रणाचा रोडमॅप 2020-25” सार्वजनिक क्षेत्रापुढे ठेवण्यात आला आहे. या दिशेने एक पाऊल म्हणून, ओएमसी चालू ईएसवाय 2024-25 दरम्यान 18% मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्याची योजना आखत आहेत. इथेनॉल डिस्टिलेशनची (उर्ध्वपतन) क्षमता वार्षिक 1713 कोटी लिटरपर्यंत वाढविणे, इथेनॉलची कमतरता असलेल्या राज्यांमध्ये डेडिकेटेड इथेनॉल प्लांट (डीईपी) उभारण्यासाठी दीर्घकालीन ऑफटेक करार (एलटीओए), सिंगल फीड डिस्टिलरीजचे मल्टी फीडमध्ये रूपांतर करायला प्रोत्साहन देणे, ई-100 आणि ई-20 इंधनाची उपलब्धता, फ्लेक्सी इंधन वाहनांची सुरुवात यासारख्या काही उपाययोजना देखील आहेत. या सर्व पावलांमुळे व्यवसाय सुलभता वाढेल, तसेच आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य होईल.

सरकारच्या ईबीपी कार्यक्रमांतर्गत असलेल्या पारदर्शकतेमुळे, ग्रीनफिल्ड आणि ब्राउनफिल्ड डिस्टिलरीजचे जाळे, साठवणूक आणि लॉजिस्टिक्स सुविधांबरोबरच रोजगाराच्या संधी आणि देशातील विविध भागधारकांमध्ये मूल्यांची देवाणघेवाण या स्वरूपात देशभरात गुंतवणुकीला चालना मिळाली आहे. सर्व डिस्टिलरींना या योजनेचा लाभ घेता येणार असून त्यांच्याकडून मोठ्या संख्येने ईबीपी कार्यक्रमासाठी इथेनॉलचा पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे परकीय चलनाची बचत होईल, कच्च्या तेलाला पर्याय उपलब्ध होईल, पर्यावरण दृष्ट्यार लाभ मिळेल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला लवकर मोबदला मिळेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पोलीसात तक्रार दिल्याच्या रागातून महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन स्कार्पने तोंड बांधले…नाशिकरोडची घटना

Next Post

मुंबईत दिल्लीप्रमाणे पेट्रोल व डिझेल वाहनांवर निर्बंध? तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली ७ सदस्यीय समिती स्थापन

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Paytm Gold Coin
संमिश्र वार्ता

पेटीएमवर प्रत्येक पेमेंटमधून मिळवा गोल्ड कॉइन

ऑक्टोबर 6, 2025
Photo 1
संमिश्र वार्ता

लातूरच्या मदियाचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरव

ऑक्टोबर 6, 2025
G2fgPljW4AATov 1024x683 1
मुख्य बातमी

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत अमित शहा म्हणाले….

ऑक्टोबर 6, 2025
IMG 20251005 222224
संमिश्र वार्ता

कोजागिरी पौर्णिमेला रात्री मसाला दूध, बासुंदी किंवा खीर का पितात?

ऑक्टोबर 5, 2025
Next Post
maha gov logo

मुंबईत दिल्लीप्रमाणे पेट्रोल व डिझेल वाहनांवर निर्बंध? तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली ७ सदस्यीय समिती स्थापन

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011