मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सरकारने जाहीर केलेल्या कोरोना निर्बंधांमध्ये जिम, ब्युटी पार्लर आणि केशकर्तनालये यांच्यासंदर्भात सुधारीत आदेश काढण्यात आले आहेत. त्यात ब्युटी पार्लर आणि जिमला ५० टक्के क्षमतेने परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी २ डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. तसेच, या दोन्ही ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षणीरित्या वाढल्याने सरकारने नवे कोरोना निर्बंध जाहीर केले आहेत. हे निर्बंध आज रात्रीपासून लागू होणार आहेत. या निर्बंधांमध्ये ब्युटी पार्लर आणि जिम यांना परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आज सरकारने सुधारित आदेश काढत त्यांना परवानगी दिली आहे. मात्र, ५० टक्के क्षमता, मास्क आणि लसीकरण ही बंधने घालण्यात आली आहेत.
हेअर कटींग सलून
1. 50 टक्के क्षमता
2. रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील.
3. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील.
4. हेअर कटींग सलून्सनी कोविडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
5. मास्क बंधनकारक