मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

खडीक्रशर व दगड खाणपट्ट्याबाबत महसूलमंत्री म्हणाले…

जानेवारी 14, 2023 | 5:12 am
in राज्य
0
3 1 1140x570 1

 

सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खडीक्रशर व दगडखाणपट्टयाचा विषय राष्ट्रीय हरित लवादाच्या क्षेत्रात असून, न्यायालयीन प्रकरण असल्याने खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी नियमानुसार पर्यावरण अनुमती घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिले.

राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण अनुमती शिवाय कोणत्याही प्रकारचे उत्खनन करू नये, अशा प्रकारे देण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करून मुकुल रोहितगी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करून हरित लवादाच्या या निर्णयाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने याचिका दाखल करून स्थगिती घेण्यात आली आहे. तथापि आज रोजी अल्पमुदतीचे गौण खनिज परवाने घेऊन उत्खननाची कार्यवाही करावयाची असल्यास ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या स्टॅंडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजरमधील तरतुदींचे पालन करूनच उत्खनन करण्याबाबत शासन स्तरावरूनही निर्देश देण्यात आलेले आहेत व पर्यावरणाच्या अनुमतीच्या व इतर सर्व अटी आणि शर्तींची पूर्तता करून खाणपट्टा आणि क्रशर अशा प्रकारचे उद्योग केल्यास भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणींना खाणपट्टा धारकांना सामोरे जावे लागणार नाही व भविष्यातील कोणत्याही प्रकारच्या कारवाया टाळण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक कायदेशीर बाबींचे पालन करणे महत्त्वाचे असल्याची गरज श्री. विखे पाटील यांनी यावेळी प्रतिपादित केली

खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी यांनी केलेल्या विनंतीनुसार नियोजन भवन सभागृहात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे , राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा गौण खनिज अधिकारी दिव्या वर्मा आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी खाणी पुन्हा सुरू करण्याची अनुमती देण्याची व दंड माफ करण्याची मागणी केली. तसेच, रॉयल्टी भरण्याची तयारी दर्शविली. तसेच अन्य जिल्ह्यांप्रमाणे अल्प मुदत 500, 1000, 2000 ब्रास खनिज उत्खनन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली.

त्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी न्यायालयीन प्रकरण असल्याने खडीक्रशर धारक व दगडखाणपट्टा धारकांनी नियमानुसार पर्यावरण अनुमती घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले. तसेच, शासन स्तरावरून देण्यात आलेल्या आदेशांच्या अनुषंगाने अन्य जिल्ह्यांनी दिलेल्या अल्पमुदतीच्या गौण खनिज परवाना प्रक्रिये बाबत अन्य जिल्ह्यांनी काढलेल्या परिपत्रकाचे तसेच निर्गमित केलेल्या आदेशांचे आणि परवानग्यांचे अवलोकन करून जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पुढील कार्यवाही करावी, असे सांगितले. तसेच खाणपट्टा धारकांनी लवकरात लवकर सर्व प्रकारच्या अटींची पूर्तता करून पर्यावरणविषयक परवानग्या मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते प्रयत्न करावेत असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

Revenue Minister On Stone Crusher and Mining

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री प्राजक्ता माळीने सुरू केला हा नवा व्यवसाय

Next Post

आताच्या आणि पूर्वीच्या चित्रपटातील कॉमेडीबद्दल विनोदाचे बादशहा जॉनी लिवर म्हणाले…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
Johny Lever e1673627090359

आताच्या आणि पूर्वीच्या चित्रपटातील कॉमेडीबद्दल विनोदाचे बादशहा जॉनी लिवर म्हणाले...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011