गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

डम्परने वाळू वाहतुकीवर येणार बंदी; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

वाळू लिलावासाठी शासनाचे नवीन धोरणाची लवकरच अंमलबजावणी, विभागातील महसूल यंत्रणेच्या कामकाजाचा व लम्पी स्कीन आजाराबाबतच्या सद्यस्थितीचा घेतला आढावा

by India Darpan
डिसेंबर 1, 2022 | 7:43 pm
in राज्य
0
IMG 20221201 WA0033

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रशासकीय स्तरावरचे वाळू लिलाव प्रक्रिया होणार नसून वाळू बाबत शासन स्तरावर लवकरच नवीन धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समितीची नियुक्ती करण्यात येईल. नव्या धोरणानुसार, डम्परने वाळू वाहतुकीवर बंदी येणार असल्याची माहिती राज्याचे महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नाशिक विभागातील महसूल यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा आणि लम्पी स्कीन आजाराबाबतच्या सद्य:स्थिती बाबतचा आढावा महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी नाशिक गंगाथरन डी., जिल्हाधिकारी अहमदनगर डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे जलज शर्मा, प्रभारी जिल्हाधिकारी जळगाव प्रवीण महाजन आणि नंदूरबार प्रभारी जिल्हाधिकारी महेश पाटील, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, उपायुक्त (महसूल) उन्मेष महाजन, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे व विभागातील सर्व प्रांत अधिकारी , पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त डॉ. नरवाडे उपस्थित होते.

दूरदृश्य प्रणालीद्वारे धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. महसूलमंत्री श्री विखे पाटील म्हणाले, सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अनाधिकृत दगडखणी बंद करुन दंडात्मक कारवाई करावी. इटीएस मशिनद्वारे सर्व दगड खाण्याचे मोजणी करावी. तसेच अनधिकृत गौण खनिजाचे वाहतुकीला आळा बसण्यासाठी sop तयार करण्याची सूचना श्री विखे पाटील यांनी केली आहे.

https://www.facebook.com/IndiaDarpanLive/videos/1477266402766188/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=DTfniY&ref=sharing

गायरान जमिनीवर व्यापारी गाळे असल्यास कारवाई
शासकीय गायरान जमिनीवर घर बांधणाऱ्यांना प्रशासनाने नोटीस जरी दिली असली तरी कारवाई थांबविण्यात आली आहे. तथापि, गायरान जमिनीवर व्यापारी गाळे असल्यास कारवाई करावी, असेही श्री विखे पाटील यांनी सांगितले. तसेच लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत २७ लाख, ६७ हजार अर्जापैकी २६ लाख नागरिकांना वक्तशीर व पारदर्शकपणे सेवा देऊन नाशिक विभागाच्या कामगिरी राज्यात उत्कृष्ट असल्याने श्री. विखे पाटलांनी समाधान व्यक्त केले. तसेच नाशिक विभागास आवश्यक ३८ वाहनांना तत्वतः मान्यता यावेळी महसूलमंत्री यांनी दिली.

लम्पी स्कीन आजाराबाबतच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर करावा
लम्पी स्कीन आजाराबाबतची माहिती अद्ययावत होण्यासाठी पोर्टल तयार करण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांना, पशुधन बाळगणाऱ्याना लसीकरण, इतर वैद्यकीय मदतीबाबत माहिती मिळू शकेल. तसेच लम्पी स्कीन बाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी करावे. त्याच बरोबरच सोशल मीडियाचा वापर करून जनतेमध्येही लम्पी स्कीन आजाराबाबत जनजागृती करावी, अशी सूचना श्री विखे पाटील यांनी केली.

यावेळी महसूल मंत्र्यांनी वाळू वाहतूक , गौण खनिज उत्खनन, गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचे क्षेत्र, अतिक्रमण हटवण्याची कारवाई आधी विषयांचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील कामकाजाची सादरी करणाद्वारे माहिती दिली. यावेळी विभागातील निवास बांधकामासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी व इतर प्रशासकीय बाबींवर चर्चा केली.

Revenue Minister On Sand Dumper Transport Ban

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जी.डी.सी. अँड ए. व सी.एच.एम. परीक्षेचा निकाल घोषित; येथे पाहता येईल

Next Post

धक्कादायक! नाशिक जिल्ह्यातील या गावांचाही गुजरातमध्ये जाण्याचा इशारा

Next Post
IMG 20221201 WA0032

धक्कादायक! नाशिक जिल्ह्यातील या गावांचाही गुजरातमध्ये जाण्याचा इशारा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011