सर्वांना महसूल दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
यावर्षी कोरोना हाताळत असतानाच आपण आपली महसुली कामे सुद्धा अत्यंत सक्षम पणे केली आणि कोरोनाचा कुठलाही परिणाम त्यावर होऊ दिला नाही..कठीण परिस्थितीतही शासकीय महसुलाची 105 टक्के वसुली करून विभागात पटकावलेला प्रथम क्रमांक आणि त्यासोबत लॉकडाऊन काळातसुद्धा नागरिकांना दिलेल्या 10.50 लाख नागरी सेवा ही आपल्या कामाप्रती असलेल्या आस्थेची उदाहरणे आहेत..”अशक्य ते शक्य करून दाखवण्याची आपली परंपरा आपण कायम ठेवली..”क्षेत्रीय स्तरावर आणि मुख्यालयात काम करणारे सर्वच अधिकारी कर्मचारी या सर्वांची यामागे खूप मेहनत आहे..खरं तर सर्वचजण सत्काराला पात्र असताना या निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात ज्यांचा सत्कार केला जात आहे त्या सर्वांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन.. या वर्षी देखील आपण आपली मूळ कामे अधिक जोरकसपणे करून त्याला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात नावीन्याची जोड देऊ आणि हे वर्ष देखील संस्मरणीय होईल याचा प्रयत्न करू.. पुन्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक