नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी चांदवड तालुक्यातील योगेश खताळ व त्याची बहिण अश्विनी खताळ यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकर्त्या खताळ भाऊ बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पोलीस ठाण्यात नेले आहे. भुमिअभिलेखच्या चुकीच्या कारभारामुळे वडिलोपार्जित क्षेत्र गमावल्याचा आरोप करत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
गेल्या चाळीस दिवसांपासून भूमी अभिलेखच्या कारभारामुळे जमीन गेल्याच्या प्रकरणातून योगेश खताळ व त्याची बहिण अश्विनी खताळ आंदोलन करत होता. त्यासाठी उपोषण सुध्दा त्याने केले. मात्र याची दखल न घेतल्यामुळे त्याने स्वातंत्र्य दिनी आत्मदहन करण्याचा अगोदरच इशारा दिला होता. त्यानंतर हे दोघे आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आले. येथे त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
गेल्या ४० दिवसापासून योगेश खताळ व त्याची बहिण अश्विनी खताळ यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू होते. त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यासाठी त्याने अगोदर इशारा दिला. त्यामुळे पोलिसांचेही त्याकडे लक्ष होते. यावेळी आत्मदहन करण्यासाठी पेट्रोल घेऊन येताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांना पोलिस स्थानकात नेले. ध्वजारोहण सोहळ्यातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे या घटनेने चांगलीच खळबळ उडाली.
An agitator attempted self-immolation outside the Revenue Commissioner's office