मुंबई – न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.