बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राजीनाम्यानंतर उद्धव आता वापरणार बाळासाहेबांचीच रणनिती

by India Darpan
जून 30, 2022 | 11:05 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
aditya and uddhav thakre

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा अखेर दिला. एवढेच नाही तर भावनिक कार्ड खेळत त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्वही सोडले आहे. यापेक्षा एक पाऊल पुढे जात उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे भविष्यासाठीही आपले मनोगत व्यक्त केले आहे. नजिकच्या आणि यापुढील काळात उद्धव हे बाळासाहेब यांचीच रणनिती वापरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

उद्धव त्यांच्या भाषणात म्हणाले की, मला त्या मार्गावर जायचे नव्हते पण मला जावे लागले. एकनाथ शिंदे यांना टोला लगावत म्हणाले की, तुम्हाला सत्तेचे पेढ लखलाभ असो मला फक्त तुमचे प्रेम हवे आहे. मी नंबर गेममध्ये जात नाही. त्यांच्याकडे बहुमत असेल, पण ते कसे जमवले गेले, हे पाहावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

येत्या काळात उद्धव पुन्हा एकदा वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गावर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरे तर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली तेव्हा ते मातोश्रीच्या परंपरेपेक्षा वेगळे होते. त्याआधी तब्बल ५ दशके बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख होते, पण मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा सभागृहाचे सदस्य होण्यापासून ते दूर राहिले. ते सरकारांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत राहिले आणि कोणत्याही सरकारच्या अपयशाची वा यशाची चटक त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.

कदाचित यामुळेच ठाकरे घराणे नेहमीच शिवसैनिकांच्या श्रद्धेचे केंद्र राहिले असून त्यांना कधीही वैयक्तिक टीका सहन करावी लागली नाही. शिवसेनेचे राजकारण समजून घेणार्‍यांचा असा विश्वास आहे की, उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि पुत्र आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळाचा भाग बनवून बाळासाहेबांच्या काळातील नैतिक दरारा कमकुवत केला. अशा परिस्थितीत ज्याची भीती वाटायची तेच व्हायला हवे होते. सरकारच्या सर्वच निर्णयांवर उद्धव थेट निशाण्यावर आले आणि सततच्या या निर्णयामुळे प्रतिमाही डागाळली. शेवटी एकनाथ शिंदे गटाने अशी बंडखोरी केली की, पक्षाची सत्ताच निघून गेली.

अशा स्थितीत मला त्या वाटेने जायचे नव्हते आणि माझी शिवसेना आहे, हा उद्धव ठाकरेंचा संदेश त्यांच्या मनोवृत्तीचे द्योतक आहे. उद्धव ठाकरे आता पुन्हा पक्ष केडर मजबूत करतील आणि वडिलांची शिकवण पाळून सत्तेपासून दूर राहून राजकारण करतील, असेच जाणकारांचे म्हणणे आहे. शिवाय लवकरच होणाऱ्या मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकांमध्ये ते आपली ताकद दाखवून देतील, असेही अनेकांनी म्हटले आहे.

After Resignation Uddhav Thackeray will go with Balasaheb Strategy Shivsena

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कमकोचे चेअरमन आणि प्रसिद्ध कांदा व्यापारी सुनिल महाजन यांचे निधन

Next Post

प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तीघांना दहा वर्ष कारावासाची शिक्षा

India Darpan

Next Post
court 1

प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तीघांना दहा वर्ष कारावासाची शिक्षा

ताज्या बातम्या

nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
आपत्ती व्यवस्थापन

दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ वारीत ठरतोय लक्षवेधी

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011