नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न अर्थव्यवस्थेतील चलनफुगवट्याचा वाढता कल रोखण्यासाठी, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ३१ मार्च २०२३ पर्यंत खालीलप्रमाणे राखीव किंमत आणखी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे: अ. खुल्या बाजार विक्री योजना (देशांतर्गत){OMSS(D)}अंतर्गत वाजवी सरासरी गुणवत्तेच्या गव्हासाठी (FAQ)राखीव किंमत २१५० रुपये प्रति क्विंटल (संपूर्ण देशात) आणि कमी विशिष्ट गटातील गव्हासह (URS) रबी विपणन हंगाम २०२३-२४ मधील सर्व पिकांसाठी खाजगी पक्षांना गहू विक्रीसाठी २१२५ रुपये प्रति क्विंटल (संपूर्ण देशात).
ब. राज्यांना ई-लिलावात सहभागी न होता वरील प्रस्तावित राखीव किमतींवर त्यांच्या स्वत:च्या योजनेसाठी भारतीय खाद्य महामंडळ ( FCI) कडून गहू खरेदी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. राखीव किंमतीतील कपातीमुळे ग्राहकांसाठी गहू आणि गव्हाच्या उत्पादनांची बाजारातील किंमत कमी होण्यास मदत होईल.
भारतीय खाद्य महामंडळ १७ फेब्रुवारी रोजी या सुधारित राखीव किमतींवर गव्हाच्या विक्रीसाठी तिसरा ई-लिलाव सुरू करेल जो २२ फेब्रुवारी रोजी उघडला जाईल.
मंत्र्यांच्या समितीने भारतीय खाद्य महामंडळ साठ्यामधून ३० लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्री योजनेद्वारे (OMSS) खालीलप्रमाणे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे: २५ लाख मेट्रिक टन गहू ई-लिलावाच्या मार्गाने व्यापारी, पिठाच्या गिरण्या इत्यादींना भारतीय खाद्य महामंडळा द्वारे अनुसरण केलेल्या नेहमीच्या प्रक्रियेनुसार देऊ केले जातील. बोलीदार प्रति लिलावासाठी प्रति प्रदेश कमाल ३००० मेट्रिक टनासाठी ई-लिलावात सहभागी होऊ शकतात. २ लाख मेट्रिक टन राज्य सरकारांना त्यांच्या योजनांसाठी @ १०,००० मेट्रिक टन प्रति राज्य ई-लिलावाशिवाय देऊ केले जातील.