मंगळवार, जून 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सर्वांत सुरक्षित बँक कोणती? रिझर्व्ह बँकेने जाहीर केली यादी; बघा, यात तुमची बँक आहे का?

by India Darpan
जानेवारी 26, 2023 | 5:21 am
in संमिश्र वार्ता
0
rbi 2

नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अडचणीच्या वेळी निकड भागावी यासाठी पै-पै जोडली जाते. सुरक्षिततेच्या दृष्टीने हा पैसा बँकेत ठेवला जातो. पण, बँका बुडीत खात्यात गेल्या, दिवाळखोरी घोषीत केली तर संकट ओढवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कल्पनेतून ग्राहकही धास्तीत असतात. पण, आता धास्तीचे कारण नाही. रिझर्व्ह बँकेने नुकतीच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली. या बँकांमध्ये आपला पैसा एकदम सुरक्षित आहे.

दरवर्षीच रिझर्व्ह बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर करते. या यादीतील बँकांना डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपोर्टेंट बँके संबोधले जाते. सुरक्षित बँकांच्या यादीत एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय यांचा समावेश आहे. बँका अडचणीत आल्यास सर्वसामान्यांनी घाम गाळून गोळा केलेला पैसासुद्धा बुडू शकतो. हे टाळण्यासाठीच केंद्र सरकार आणि आरबीआय विशेष योजना राबविते. या बँकांना कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तर केंद्र सरकार त्यांना वाचविण्यासाठी विशेष भर देते. त्यातून डीएसबीआयची सुरुवात झाली. त्यासाठी निकष ठरविण्यात आले आहेत.

2008 साली जागतिक मंदी आली. अर्थात भारताला या मंदीची फार झळ बसली नाही. पण जगातील अनेक मोठ्या बँका या मंदीत धराशायी झाल्या. त्यावेळी केंद्र सरकार आणि आरबीआयने अशा काही बँकांची निवड करण्याची गरज वाटली. या बँका मंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला ताबडतोब मदत करतील, यासाठी त्यांना सर्व सुविधा देण्याची योजना आखण्यात आली आणि त्यानुसार दरवर्षी सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली जाते.

पहिली यादी 2015 मध्ये
2014 साली आरबीआयने बँकांच्या निवडीसाठी फ्रेमवर्क तयार केली. 2015 मध्ये डीएसआयबीने पहिली यादी तयार केली. या पहिल्या यादीत एसबीआय आणि आयसीआयसीआयने स्थान पटकावले होते. त्यानंतर या यादीत आणखी एका बँकेची भर पडली. एचडीएफसी बँकेने या यादीत प्रवेश केला. पहिल्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक आहे. त्यानंतर एसबीआयचा क्रमांक लागतो. या बँकांना काही नियमही लागू असतात. या नियमांचे त्यांना पालन करावे लागले. देशाच्या राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 2 टक्क्यांहून ज्या बँकांची एकूण संपत्ती असते, त्यांचा समावेश डीएसआयबी बँकांच्या यादीत करण्यात येतो. काही खास मुद्यांच्या आधारे या बँकांना पाच विविध श्रेणीत समाविष्ट करण्यात येते. चढत्या क्रमाने ही यादी तयार करण्यात येते.

Reserve Bank Of India Release Safest Bank See Details

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरे च्या…‘व्हॅलेंटाईन डे’पूर्वी सर्व विद्यार्थिनींना बॉयफ्रेंड बंधनकारक! कॉलेजची नोटीस व्हायरल

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post
Vichar Dhan

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी 2 1024x682 1

जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या कामांच्या गुणवत्तेसाठी लवकरच क्वॉलिटी कंट्रोल धोरण….

जून 3, 2025
Hon CM Japan Deligation Meeting 4 1024x406 1

तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र

जून 3, 2025
Untitled 6

धक्कादायक…एनसीईआरटीच्या २० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची निर्मिती…

जून 3, 2025
GscFSVjaQAAtzfC

आयपीएल ट्रॉफीच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट…पावसामुळे सामना न झाल्यास कोणाला ट्रॅाफी?

जून 3, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या संधी, जाणून घ्या, बुधवार, ३ जूनचे राशिभविष्य

जून 3, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील नोंदणीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली…

जून 2, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011