पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ग्रेड A आणि ग्रेड B पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI च्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
RBI ग्रेड A आणि ग्रेड B साठी ऑनलाइन अर्जाची लिंक 28 मार्च 2022 रोजी उपलब्ध असेल. या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना 18 एप्रिल 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. RBI ग्रेड बी परीक्षा 28 मे ते 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेतली जाईल, तर ग्रेड A परीक्षा 21 मे 2022 रोजी होईल.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 303 पदांची भरती केली जाणार आहे, त्यापैकी 294 अधिकाऱ्यांची पदे B श्रेणी अंतर्गत समाविष्ट आहेत. यामध्ये ऑफिसर्स ग्रेड ‘बी’ (DR) जनरलच्या 238 पदे, ऑफिसर ग्रेड ‘बी’ (DR) DEPR च्या 31 पदे, ऑफिसर्स ग्रेड ‘B’ (DR) DSIM च्या 25 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 9 पदांचा समावेश आहे.
सदर पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि त्यानंतर मुलाखतीच्या आधारे केली जाईल. आरबीआय ग्रेड बी ऑफिसरच्या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 55,200 रुपये आणि ऑफिसर ग्रेड बी (डीआर) डीईपीआरला 44,500 रुपये प्रति महिना दिले जातील.
ग्रेड बी पदांसाठी अर्ज करणाऱ्या एससी/एसटी/पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांकडून 100 रुपये आणि सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांसाठी रु. ८५० शुल्क आकारले जाईल. त्याच वेळी, ग्रेड A पदांसाठी, सामान्य / OBC / EWS उमेदवारांना 600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.