पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात शिक्षण घेतल्यानंतरही बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊन त्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात. त्यातच शासकीय नोकरी असो की बँकिंग सेवा, यामध्ये जाण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात, त्यातच आता बँकिंग सेवेत जाण्याची तरुणांना मोठी संधी मिळणार आहे, याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांवर भरती होणार आहे. आरबीआयने अधिसूचना जारी केली असून एकूण 950 पदांची भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rbi.org द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज केवळ आरबीआयच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन स्वीकारले जातील.
RBI सहाय्यक भरती 2022 महत्त्वाच्या तारखा अशा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – १७ फेब्रुवारी २०२२,
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ मार्च २०२२
परीक्षा शुल्काचा भरणा (ऑनलाइन) – १७ फेब्रुवारी २०२२
परीक्षा शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – ८ मार्च २०२२
प्राथमिक परीक्षेची तारीख (तात्पुरती) – 26, 27 मार्च, 2022
मुख्य परीक्षा (तात्पुरती) – मे २०२२
RBI सहाय्यक भरतीसाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात. उच्च वयोमर्यादेत खालीलप्रमाणे सवलत दिली जाईल.
अर्ज कसा करा
1. उमेदवारांना RBI च्या अधिकृत वेबसाइट rbi.org.in ला भेट द्यावी लागेल.
2. होमपेजवर करिअर किंवा व्हेकन्सी विभागात जा. त्या भरती लिंकवर क्लिक करा.
3. आता New Registration वर क्लिक करा.
4. विचारलेले सर्व तपशील देऊन अर्ज भरण्यास सुरुवात करा.
5. सर्व महत्वाची कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
6. फॉर्म सबमिट केल्यानंतर, भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घेण्यास विसरू नका