मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनेक नागरिकांना वेगवेगळे छंद असतात कोणी पोस्टाच्या तिकिटे जमा करतो तर कोणी वेगवेगळ्या प्रकारे छायाचित्रे किंवा चित्रे जमा करतो. काही नागरिकांना जुनी नाणी आणि नोटा जमा करण्याचा छंद असतो. हा छंद जोपासताना ते वेगवेगळ्या संस्था , संघटना आणि नागरिकांशी संपर्क साधतात परंतु या प्रकारे जुन्या नोटा आणि नाणी जमवताना काहीवेळा फसवणूक देखील होऊ शकते. या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत ग्राहकांना सतर्क केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी आपल्या ग्राहकांशी संवाद साधते. यासोबतच तो बँकांना सूचनाही देत असते, आता रिझर्व्ह बँकेने नागरिकांना आणखी एक इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. कारण काहीवेळा गुन्हेगार लोक त्यांच्या फसव्या बोलण्यात फसावेत म्हणून आकर्षक आश्वासने देतात.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ग्राहकांना जुन्या नोटा आणि नाणी खरेदी किंवा विक्रीच्या ऑफरला बळी पडण्यापासून सावध केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये आरबीआयने म्हटले आहे की, काही घटक भारतीय रिझर्व्ह बँकेचे नाव आणि चिन्ह चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत आणि विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मद्वारे लोकांना जुन्या नोटा आणि नाणी विकण्यास सांगत आहेत.
इतकेच नव्हे तर या फसवणूक करणार्यांकडून ड्युटी, कमिशन किंवा कर वसूल केला जात आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँक असे कोणतेही काम करत नसल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. तसेच RBI कधीही कमिशन किंवा कर आकारत नाही. नागरिकांनी अशा प्रकारचे प्रस्ताव किंवा खोट्या गोष्टींमध्ये कधीही येऊ नये. अन्यथा, यामुळे त्यांचे पैसे गमावू शकतात.