मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चांगली आर्थिक प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी क्रेडिट स्कोअर चांगला असणे खूपच आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर बिघडल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे तुम्हाला बँका आणि इतर आर्थिक संस्थांकडून कर्ज मिळणे कठीण होईलच, शिवाय आगामी काळात विमा कंपन्यांकडून पॉलिसी देण्यासही नकार दिला जाऊ शकतो. याचाच अर्थ तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार नाही.
रिझर्व्ह बँकेने (आरबीआयक) क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीज रेग्युलेशन-२००६ मध्ये बदल केला आहे. याअंतर्गत अनेक फिनटेक कंपन्यांना क्रेडिट ब्युरोचा डेटा अॅक्सेस करण्याची सवलत देण्यात आली आहे. या नियमांमुळे त्या फिनटेक कंपन्यांना फायदा होणार आहे, ज्यांच्याकडे गैरबँकिंग आर्थिक कंपन्यांचा (एनबीएफसी) परवाना नाही. तसेच कर्ज देण्यासाठी बँकांशी करार केला आहे.
नव्या नियमांतर्गत या कंपन्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर ग्राहकांना कर्ज देऊ शकणार आहेत. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कंपन्यांकडून स्वस्त कर्ज मिळू शकते. क्रेडिट स्कोअर खरबा झाल्यास कर्ज मिळण्यासाठी अडचणी येतील. साधारणतः ७५० किंवा त्याहून अधिकचा क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.
फिनटेक कंपन्यांसाठी अटी
१) आरबीआयने ग्राहकांचे सुरक्षित हित पाहून सवलत देण्यासाठी काही अटी निश्चित केल्या आहेत.
२) क्रेडिटसंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कंपन्यांचे नेटवर्थ हवेत.
३) त्यांच्याकडे सायबर सिक्योरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर सिक्योरिटी ऑडिटरचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. यावरून कंपन्यांकडे कठोर आणि सुरक्षित इन्फॉर्मेशन तंत्रज्ञान आहे हे कळते.
४) फिनटेक कंपन्यांकडे जाणारी कोणत्याही व्यक्तीची माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे हे सुनिश्चित
होते.
फसवणूक टळणार
– नव्या नियमांतर्गत ग्राहकांची फसवणूक टळेल. फिनटेक कंपन्यांकडे तुमचे कर्ज आणि क्रेडिट स्कोअरची पूर्ण माहिती घेण्याची परवानगी असेल.
– या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले होते, की क्रेडिट इन्फॉर्मेशन थेट फिनटेक कंपन्यांना सामायिक केले जाऊ शकत नाही. कारण बँका त्यांना एजंट म्हणून नियुक्त करत असून, हे नियमांच्या विरुद्ध आहे.