मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील कोणत्याही बँकेने ग्राहकांचे हित व देशाचा आर्थिक विकास हेच त्यांचे उद्दिष्ट असावे, असा नियम तथा धोरण आहे. मात्र काही बँका या नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे रिझर्व बँकेला कारवाई करावी लागते. अशाच प्रकारे ग्राहकांचे हित लक्षात घेण्यास टाळाटाळ केल्याने राज्यातील सहकारी क्षेत्रातील ३ मोठ्या बँकेविरुद्ध कारवाई करण्यात आली. यामुळे सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये खळबळ उडाली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तीन बँकांवर नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे. बँकांकडून नियमांचे पालन न केल्यास रिझर्व्ह बँक दंड आकारत असते. या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांवरही परिणाम होत असतो. रिझर्व्ह बँकेने या कारवाई संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यात RBIने म्हटले की, ‘महाराष्ट्रतील तीन बँकांनी फसवणूक आणि देखरेख संदर्भात जारी केलेल्या नाबार्ड निर्देशांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे.
महाराष्ट्रातील ३ बॅंकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. जाणून घ्या कोणत्या बॅंका आहेत, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) तीन बँकांवर नियमांचं पालन न केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातील 3 बॅंकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंक, द यवतमाळ को-ऑपरेटिव्ह बॅंक लि., वरुड को-ऑपरेटिव्ह बॅंक लि. या तीन बॅंकावर दंडात्मक कारवाई आहे.
रिझर्व्ह बँकेने अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकांसाठी आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला ७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर केवायसीप्रकरणी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला ३.५० लाखांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेनं आरबीआयनं सहकारी बॅंकांना जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि केवायसीप्रकरणी १ लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.
भारतातील एकूण आठ को-ऑपरेटिव्ह बॅंकांना आरबीआयकडून दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. मेहसाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला ४० लाखांचा दंड, छत्तीसगड राज्य सहकारी बॅंक मर्यादित, रायपूरला २५ लाखांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. तर मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्रीय बॅंक मर्यादीत, छिंदवाडा आणि गऱ्हा को-ऑपरेटिव्ह बॅंक यांना एक-एक लाखांचा दंड तर द गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह बॅंक, पणजी येथील बॅंकेवर २.५१ लाखांची आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी जुलै महिन्यात द नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या बॅंकावर आरबीआयनं कारवाई केली होती. यावेळी रिझर्व्ह बँकेने या कारवाई संदर्भात एक निवेदन जारी केले होते. तसेच यात RBIने म्हटलं होतं की, मुंबईतील ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँके’ने फसवणूक आणि देखरेख संदर्भात जारी केलेल्या नाबार्ड निर्देशांचे पालन न केल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे बँकेला ३७.५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.
Reserve Bank of India Maharashtra Co Operative Bank Action
Banking Finance Fine Penalty KYC