मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकॉनॉमी रिसर्च टीमने म्हटल्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) जूनमध्ये रेपो दरात किमान २५ बेस पॉईंटने वाढ करणार आहे. ऑगस्टच्या बैठकीतही हा कल कायम राहण्याची शक्यता आहे.
येत्या काही दिवसांत तुमच्या कर्जाचा हफ्ता वाढू शकतो. एसबीआयच्या इकोरॅप अहवालातून हे संकेत मिळाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इकॉनॉमी रिसर्च टीमने म्हटले आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) जूनमध्ये रेपो दरात किमान २५ बेस पॉइंट्सने वाढ करेल. ऑगस्टच्या बैठकीतही हा कल कायम राहण्याची शक्यता आहे. याचा अर्थ रेपो दर सलग दोनदा वाढवता येऊ शकतो. चलनविषयक धोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दर ४ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. ही सलग दहावी वेळ आहे जेव्हा आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.
काय आहे तोटा
असे झाल्यास कर्जाचे व्याजदर वाढू शकतात. बँकाही रेपो रेटच्या आधारे कर्जाचे व्याजदर ठरवतात. यामुळेच रेपो दरात वाढ किंवा घट झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या घर किंवा कार कर्जाच्या ईएमआयवरही परिणाम होतो.
महागाई नियंत्रणावर भर
एसबीआयच्या अहवालानुसार, आरबीआय महागाई नियंत्रणावर भर देण्याच्या बाजूने आहे. किरकोळ आणि घाऊक महागाईत वाढ झाली आहे. किरकोळ चलनवाढ, ग्राहक किंमत आधारित निर्देशांकाद्वारे मोजली गेली. मार्च २०२२मध्ये वार्षिक आधारावर ६.९५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ती फेब्रुवारी २०२२मध्ये ६.०७ टक्के होती.
कोरोना संकटानंतर आता युक्रेन आणि रशियामधील युद्धामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच महागाईही वाढली आहे. गेल्या पतधोरण बैठकीतही आरबीआयने याबाबत विचारमंथन केले होते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई ५.३ टक्के राहण्याची अपेक्षा आहे.