मुंबई – नियमांचे उल्लंघन करत असल्याच्या कारणावरून भारतीय रिझर्व्ह बँकेने विविध बँकांवर फास आवळला असून, त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गतच आरबीआयने आयसीआयसीआय बँक आणि पंजाब नॅशलनल बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरबीआयने आयसीआयसीआय बँकेला ३० लाख रुपये, तर पंजाब नॅशनल बँकेला १.८० कोटी रुपयांचा दंड सुनावला आहे.
आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आरबीआयने पंजाब नॅशनल बँकेचे निरीक्षण मूल्यांकन करताना ३१ मार्च २०१९ रोजी आर्थिक स्थितीबाबत वैधानिक तपास केला होता. या तपासादरम्यान विविध कागदपत्रांची छाननी केल्यानंतर पीएनबीने गहाण ठेवलेल्या शेअर्ससंबंधित तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले.
तर आयसीआयसीआय बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत निरीक्षण मूल्यांकन करताना आरबीआयने ३१ मार्च २०१९ रोजी वैधानिक तपास केला होता. तपासादरम्यान बचत खातेधारकांनी खात्यात किमान रक्कम न ठेवल्याबद्दल शुल्क न लावल्यासंदर्भातील निर्देशांचे पालन करण्यात आले नाही, असे आढळून आले.