मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय रिझर्व्ह बँकेने नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी आठ सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. विशाखापट्टणम सहकारी बँकेला सर्वाधिक ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने अनेक निवेदने जारी करून ही माहिती दिली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह बँक कैलासपुरम (तिरुचिरापल्ली, तामिळनाडू), केरळच्या ओट्टापलम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडला ५ लाख तर हैदराबादच्या दारुसलाम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेला १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, गांधीनगरच्या नेल्लोर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लि. आणि काकीनाडाच्या काकीनाडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक लि. यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. केंद्रपाडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, केंद्रपाडा यांना १ लाख रुपये, नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., प्रतापगड, उत्तर प्रदेशला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Reserve Bank of India Fine 8 Cooperative Banks
Banking Finance Penalty Business