मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नोटा वापरताना यापुढे तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. कारण रिझर्व्ह बँकेने या संदर्भात काही नियम केले आहेत. आता नोटांचीही फिटनेस चाचणी होणार आहे. अनेकदा काही जण जुन्या आणि फाटलेल्या नोटा वापरण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, आता आरबीआयच्या नव्या निर्णयानंतर नोटांची योग्यता तपासली जाणार आहे. जर तुमच्या पाकिटातील नोट फिटनेस चाचणीत फेल ठरल्या तर त्या वापरता येणार नाहीत.
असे म्हटले जाते की, जीवनात पैशाशिवाय पाऊलही पडत नाही, आजच्या काळात तर पैसा ही सब कुछ है ! किंवा पैसाही भगवान है, असे म्हटले जाते. कारण घराबाहेर पडले की पैसे लागतातच, गाडीच्या पेट्रोलसाठी, बस -रिक्षा भाड्यासाठी, भाजीपाला खरेदीसाठी, बाहेर खाण्यापिण्यासाठी, किराणा आणण्यासाठी, पैसा आवश्यकच असतो. इतकेच नव्हे तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पैसा लागतोच, म्हणजे सकाळी दात घासताना ब्रश पेस्टसाठी, चहा पिताना दूध साखर या साठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी, बाहेरगावी जाण्यासाठी पैसा हा आवश्यकच असतो. त्यामुळेच प्रत्येकाला पैसा कमवावा लागतो, जमवावा लागतो आणि खिशात ठेवावे लागतात, आजच्या काळात चलनी नोटांऐवजी ऑनलाईन पद्धती आली आहे. तरी मोठ्या प्रमाणात नोटांचा वापर होतो.
आरबीआयने आदेश दिले की, रिझर्व्ह बँकेने बँकांना नोटा मोजण्याऐवजी नोटांची फिटनेस तपासण्यासाठी नवीन मशीन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँकिंग प्रणालीमध्ये अनेक वर्षांपासून खराब नोट चालत आलेल्या आहेत. त्यामुळे नोटांचा फिटनेस तपासला जाईल. तुमच्या खिशात ठेवलेली नोट योग्य की अयोग्य आहे? हे तपासण्यासाठी आरबीआयने ११ मानके निश्चित केली आहेत. तसेच रिझर्व्ह बँकेला अहवाल पाठवावा लागणार आहे, यात फिटनेस टेस्टमध्ये कोपरे दुमडलेल्या, गोंद किंवा टेपने चिकटवलेल्या नोटा अयोग्य समजल्या जातील. बँकांना प्रत्येक तीन महिन्यांनी नोटांच्या फिटनेस टेस्टबाबत रिझर्व्ह बँकेला अहवाल पाठवावा लागेल. कोणकोणत्या नियमांना किती नोटा पूर्ण करू शकल्या नाहीत, हे अहवालात स्पष्ट करावे लागणार आहे.
विशेषतः खराब नोटा, कोपरे दुमडलेल्या, अतिशय घाणेरड्या अवस्थेत असलेल्या, भरपूर धूळ असलेल्या, नरम पडलेल्या नोटा, ८ चौरस मिलीमीटर पेक्षा मोठे छिद्र असलेली नोट, नोटमधील कोणताही ग्राफिक बदल अयोग्य मानला जाणार आहे. त्याचप्रमाणे नोटेवर खूप डाग, पेनाची शाई असेल तर, नोटांवर काही लिहिले असल्यास किवा कोणत्याही प्रकारच्या पेंटिंग असल्यास, नोटेचा रंग उडाला असेल तर फाटलेल्या नोटेवर कोणत्याही प्रकारचा टेप, नोटांचा रंग गेला असल्यास त्या चालणार नाहीत.
आतापर्यंत नोट सॉर्टिंग मशीनमध्ये फक्त खऱ्या आणि बनावट नोटांची ओळख होत होती. त्यामुळे नोटा वाईट स्थितीत पोहोचल्या होत्या. सध्या सर्व नोटा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नोटांची वर्गवारी करणारी यंत्रे बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. बँक ग्राहकांची नोट नाकारून त्याऐवजी ग्राहकाला दुसरी नोट देईल.
जर तुमच्याकडेही 5, 10, 20, 50,100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या जिर्ण, फाटक्या नोटा आल्या असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (नोट रिफंड) नियम, 2009 मध्ये आता अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. नियमांनुसार, नोटेच्या स्थितीनुसार, लोक आरबीआय कार्यालय आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये फाटलेली किंवा सदोष नोट बदलू शकतात.
Reserve Bank of India currency notes new rules