नवी दिल्ली – भारतीय रुपयाची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने ५ अब्ज डॉलर्सची विक्री करून रुपयाचे मूल्य घसरण्यापासून रोखले आहे. आरबीआयने प्रभावी हस्तक्षेप केल्याचे आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाला स्थिर कक्षेत ठेवण्याच्या उद्देशाने दलालांकडून डॉलरची विक्री किंवा खरेदी करण्यासाठी आरबीआय बाजारात प्रवेश करते. परंतु परकीय गुंतवणूकदारांकडून सलग शेअर्सची विक्री सुरू झाल्यास रुपयाचे अवमूल्यन होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल बँकेच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या सतर्कतेसह ओमिक्रॉनच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांच्या भावाना प्रभावित झाल्या आहेत. विशेषतः अमेरिकेतील कठोर तरलता नियंत्रणामुळे जागतिक गुंतवणूकादारांना भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रेरित करत आहेत. बुधवारी रुपया ७५.५५ वर ग्रीनबँकवर बंद झाला होता.
गेल्या आठवड्यात रुपया साप्ताहिक आधारावर खूपच कमकुवत होऊन ७६.०९ डॉलरवर बंद झाला होता. भारतीय रुपया या आठवड्यात २० महिन्यांच्या सर्वात खालच्या पातळीवर पोहोचून स्थिर झाला आहे. अॅडलव्हाइस सिक्योरिटीजतचे फॉरेक्स आणि रेस्टचे प्रमुख सजल गुप्ता सांगतात, नुकतेच ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे प्रतिक्रियेच्या रूपाने रुपयाच्या घसरणीला सुरुवात झाली होती. मधल्या आठवड्यात जेव्हा रुपया ७६.३१ च्या खालच्या स्तरावर पोहोचला होता. तेव्हा आरबीआयने बाजारात हस्तक्षेप केला होता. आगामी काळात रुपया स्थिर राहण्याची शक्यता असल्याने पुढील काळात आरबीआयकडून अशी कारवाई होण्याची शक्यता नाही.
नुकतेच आरबीआयने रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवल्याने फेडरल रिझर्व्हकडून आपल्या टेपिंगची गती वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रुपयावर दबाव आला. भारतीय शेअर बाजारात एफआयआय म्हणजे परकीय गुंतवणूकदार शुद्ध विक्रेते राहिले आहेत. रुपयाचा कमकुवतपणा दिसून आल्यामुळे संभाव्य अस्थिरता रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप केला आहे.